इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्समध्ये करण जोहर आणि रोहित शेट्टी बनले जय-वीरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 14:02 IST2018-04-02T08:32:41+5:302018-04-02T14:02:41+5:30
‘शोले’ चित्रपटातील जय आणि वीरू या जिवलग मित्रांमधील दोस्ती हा आजही पडद्यावरील घनिष्ठ मैत्रीचा मापदंड समजला जातो. प्रेक्षक आजही ...

इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्समध्ये करण जोहर आणि रोहित शेट्टी बनले जय-वीरू
‘ ोले’ चित्रपटातील जय आणि वीरू या जिवलग मित्रांमधील दोस्ती हा आजही पडद्यावरील घनिष्ठ मैत्रीचा मापदंड समजला जातो. प्रेक्षक आजही त्यांच्या घनिष्ट मैत्रीचे गुण गातात. ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’ हे त्यांचे गीत आजही मैत्रीचे प्रतीकगीत मानले जाते. जय आणि वीरूने आपल्या मैत्रीने आजही रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. नुकतेच करण जोहर आणि रोहित शेट्टी यांनी या दोघांच्या आठवणी जाग्या करताना आपल्या दोघांमधील मैत्रीचे गीत गायले. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे गाणे जरी एका स्कूटरवर चित्रीत केले गेले होते, तरी करण आणि रोहित यांनी एका ऑटो रिक्षामध्ये बसून आपल्या मैत्रीचे गीत गायले. आपल्या चित्रपटांतील स्टंट प्रसंगांमध्ये मोटारगाड्या हवेत उडवणाऱ्या रोहितला ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स’ या कार्यक्रमात एक ऑटो रिक्षा चालवण्याचे आव्हान देण्यात आले होते. रोहितने ही ऑटो रिक्षा तर चालविलीच. पण करणही त्याच्या जोडीला जाऊन बसला आणि मग त्यांनी शोले चित्रपटातील ते प्रसिद्ध गाणे गायले. आता बॉलिवूडला करण आणि रोहितच्या रूपात नवे जय आणि वीरू मिळाले आहेत.
इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार्स या कार्यक्रमात प्रेक्षकांना अभिनय क्षेत्रातील अतिशय दुर्मिळ अशी आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळत आहे. या कार्यक्रमात करण जोहर आणि रोहित शेट्टी हे सामान्य लोकांसाठी बॉलिवूडचे दरवाजे केवळ खुलेच करत नाहीयेत तर त्यांच्या सिनेमांमध्ये या शोमधील विजेत्यांना ब्रेकही देणार आहेत. या शोबद्दल बोलताना रोहितने सांगितले होते की, “माझ्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजे फक्त एकच गोष्ट एन्टरटेनमेंट. जर एक फिल्म मेकर म्हणून मी ते करू शकलो तर मी माझे काम केले आहे. पण जेव्हा तुम्ही कॅमेऱ्यासमोर असता तेव्हा गोष्ट वेगळी असते. अशा अनेक अभिनेत्यांची उदाहरणे आहेत ज्यांनी त्यांच्या मेहनतीने, टॅलेंटने सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे आणि अनेक दशके उलटून गेल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनामध्ये ते घर करून आहेत. इतक्या वर्षांनी देखील त्यांची लोकप्रियता कशी काय कायम आहे याची व्याख्या कोणीच करू शकणार नाही. एक चांगला अभिनेता नेहमीच लक्षात राहतो आणि देशातील रसिकही त्याच्यावर प्रेम करतात. त्यामुळे स्टार इंडिया आमच्यासोबत इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्सचा शोध घेत आहेत.”
Also Read : करण जोहरला त्याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांपेक्षाही आवडतो हा चित्रपट