बाई हा काय प्रकार? स्पर्धकाच्या डोक्यावर गॅस ठेवला आणि चहा बनवला, 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये मलायकाचा प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 10:10 IST2025-11-19T10:09:55+5:302025-11-19T10:10:22+5:30
मलायका अरोराने 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये तिचं हटके टॅलेंट दाखवलं आहे. जे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बाई हा काय प्रकार? स्पर्धकाच्या डोक्यावर गॅस ठेवला आणि चहा बनवला, 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये मलायकाचा प्रताप
'इंडियाज गॉट टॅलेंट'चं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पर्वात अनेक सामान्य व्यक्ती आणि कलाकारांनाही त्यांच्याकडे असलेलं हटके टॅलेंट दाखवण्याची संधी मिळते. मलायका अरोरा, नवज्योत सिंग सिद्धू आणि सिंगर शान हे या शोचे परिक्षक आहेत. या शोमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मलायका अरोराने 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये तिचं हटके टॅलेंट दाखवलं आहे.
सोनी टीव्हीच्या ऑफिशियल सोशल मीडियावरुन 'इंडियाज गॉट टॅलेंट'मधला एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत सिद्धू पाजी मलायकाला "चार इलायची डालके थोडी चाय पिला दो", असं म्हणत आहेत. त्यावर मलायका म्हणते, "नाम है मलायका तो इस चाय के साथ थोडा मलायका मारके देती हूँ". त्यानंतर मलायका 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये आलेल्या स्पर्धकाच्या डोक्यावर गॅस ठेवून चहा बनवत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या स्पर्धकाच्या डोक्यावर काचेचा ग्लास त्यावर गॅस ठेवल्याचं दिसत आहे. त्यावर पातेलं ठेवून मलायका चहा बनवत असल्याचं दिसत आहे.
'इंडियाज गॉट टॅलेंट'मधील मलायकाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. 'इंडियाज गॉट टॅलेंट' ४ ऑक्टोबरपासून सुरू झालं आहे. शनिवार आणि रविवार रात्री ९.३० वाजता हा रिएलिटी शो प्रेक्षकांना पाहता येतो.