'इंडियन आयडॉल' फेम लोकप्रिय गायकाचा भीषण अपघात, हॉस्पिटलमधील फोटो पाहून चाहत्यांना जबर धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 12:33 IST2025-05-05T12:23:48+5:302025-05-05T12:33:17+5:30
Pawandeep Rajan Car Accident: 'इंडियन आयडॉल' विजेत्या गायकाचा अहमदाबाद येथे भीषण अपघात झाला असून त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. गायक बरा व्हावा म्हणून सर्वजण प्रार्थना करत आहेत

'इंडियन आयडॉल' फेम लोकप्रिय गायकाचा भीषण अपघात, हॉस्पिटलमधील फोटो पाहून चाहत्यांना जबर धक्का
'इंडियन आयडॉल' या लोकप्रिय रिअॅलिटी शो गाजवणारा गायक पवनदीप राजनचा (pawandeep rajan) भीषण अपघातात झाला आहे. पवनदीपचे हॉस्पिटलमधून व्हिडीओ समोर आले आहेत. यात पवनदीप बेडवर झोपला असून त्याच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरु असल्याचं दिसतंय. अहमदाबादमध्ये कारच्या भीषण अपघातात पवनदीप गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पवनदीपच्या चाहत्यांना या बातमीमुळे जबर धक्का बसला असून तो बरा व्हावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.
पवनदीपचा अपघात नेमका कसा आणि कधी झाला याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. पवनदीपच्या गाडीचं यात चांगलंच नुकसान झालंय. पवनदीप हॉस्पिटलमध्ये बेडवर आडवा पडून कोणाशीतरी बोलत असल्याचा दिसतोय. पवनने 'इंडियन आयडॉल'च्या १२ व्या सीझनचं विजेतेपद पटकावलं होतं. तो मूळचा उत्तराखंडचा आहे. 'इंडियन आयडॉल' शिवाय The Voice India season 1 हा शो सुद्धा पवनने जिंकला होता.
पवनदीप राजनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, 'इंडियन आयडॉल'च्या १२ व्या सीझनचं विजेतेपद पटकावल्यानंतर तो त्याच्या स्वतःच्या गायनाचे कार्यक्रम करताना दिसतो. भारतात नव्हे तर परदेशातही पवनदीप राजनच्या म्यूझिक कॉन्सर्टला त्याचे चाहते हजेरी लावत असतात. सोनू निगम, सलीम मर्चंट अशा अनेक दिग्गज गायक पवनच्या गाण्याचं कौतुक करताना दिसतात. पवन या अपघातातून सावरुन लवकर बरा होईल, अशी त्याच्या चाहत्यांना आशा आहे.