इंडियन आयडल फेम राहुल वैद्य करतोय 'या' अभिनेत्रीला डेट, अशी सुरू झाली लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 06:00 IST2019-08-10T06:00:00+5:302019-08-10T06:00:00+5:30
राहुल वैद्यने मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक गाण्यांना आपला आवाज. प्रोफेशनल लाईफ इतकंच राहुलचे वैयक्तिक आयुष्यदेखील घेऊन चर्चेत राहिला.

इंडियन आयडल फेम राहुल वैद्य करतोय 'या' अभिनेत्रीला डेट, अशी सुरू झाली लव्हस्टोरी
इंडियन आयडॉल या पहिल्या म्युझिक रिअॅलिटी शोमुळे अनेक गायकांना नवं व्यासपीठ मिळालं. इंडियन आयडॉल या शोमुळे रिअॅलिटी शोची संकल्पना भारतात रुजली. पहिल्या इंडियन आयडलच्या सीझनचा विजेता ठरला होता अभिजीत सावंत. अभिजीत सावंत जरी विजेता ठरला तरी या सीझनमधील अनेक स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले. यातलचे एक नाव म्हणजे राहुल वैद्य. राहुल वैद्यने मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक गाण्यांना आपला आवाज. प्रोफेशनल लाईफ इतकंच राहुलचे वैयक्तिक आयुष्यदेखील घेऊन चर्चेत राहिला.
राहुलचं नावं अनेक मुलींसोबत जोडण्यात आलं. सध्या राहुल प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ मधील दिशा परमारला डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघे राहुल वैद्यच्या 'याद तेरी' या गाण्याच्या अल्बममध्ये एकत्र दिसले होते.
एबीपी न्यूच्या रिपोर्टनुसार राहुलने सांगितले की, त्याला आणि दिशाला एकत्र वेळ स्पेंट करायला आवडतो. पण आपण अजून प्रेमात आहोत की नाही हे आम्हालाच माहीत नाही.’ दोन वर्षांपूर्वी दोघांची ओळख झाली आहे. आम्ही दोघे एकमेकांना चांगल्या प्रकारे समजण्याचा प्रयत्न करतोय. दिशा एक साधी सरळ मुलगी आहे.''
दिशानेही राहुल आणि ती जवळचे मित्र असल्याचं मान्य केलं आहे. पण याव्यक्तिरिक्त अजूनही कोणत्या नात्याबाबत स्पष्टता केलेली नाही. दिशा गेले काही वर्ष इंडस्ट्रीमध्ये असून तिचं आतापर्यंत कोणाहीबरोबर नाव जोडलं गेलेलं नाही. त्यामुळे राहुल आणि दिशाचे फॅन्स दोघे कधी अधिकृतरित्या आपलं नातं स्वीकारतात याबाबत उत्सुक आहेत.