'थोडी लाज वाटू दे'; सगळ्यांसमोर विशाल ददलालीने पवनदिपला सुनावलं?, नेमकं काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 10:29 IST2026-04-10T10:23:15+5:302026-04-10T10:29:34+5:30

Pawandeep rajan: इंडियन आयडॉल १६ च्या मंचावर या शोच्या सगळ्या जुन्या स्पर्धकांचं रियुनियन झालं. यात या शोच्या १२ व्या पर्वाचा विजेता पवनदिपदेखील सहभागी झाला होता.

indian-idol-pawandeep-rajan-romantic-performance-karishma-kapoor-vishal-dadlani-angry | 'थोडी लाज वाटू दे'; सगळ्यांसमोर विशाल ददलालीने पवनदिपला सुनावलं?, नेमकं काय आहे प्रकरण

'थोडी लाज वाटू दे'; सगळ्यांसमोर विशाल ददलालीने पवनदिपला सुनावलं?, नेमकं काय आहे प्रकरण

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग शो म्हणजे इंडियन आयडॉल. आतापर्यंत या कार्यक्रमामुळे इंडस्ट्रीला अनेक दिग्गज गायक लाभले आहेत. सध्या या शोचं १६ वं पर्व गाजत आहे. नुकताच  इंडियन आयडॉल १६ च्या अपकमिंग भागाचा एक प्रोमो रिलीज झाला. या प्रोमोमध्ये विशाल ददलानी यांनी सगळ्यांसमोर पवनदिप राजनला खडेबोल सुनावल्याचं पाहायला मिळालं.

इंडियन आयडॉल १६ च्या मंचावर या शोच्या सगळ्या जुन्या स्पर्धकांचं रियुनियन झालं. यात या शोच्या १२ व्या पर्वाचा विजेता पवनदिपदेखील सहभागी झाला होता. स्पेशल गेस्ट म्हणून त्याला या मंचावर आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, इथे आल्यावर विशाल ददलानीने सगळ्यांसमोर त्याला 'थोडी लाज वाटू दे', असं म्हटलं. ज्यामुळे उपस्थित सगळेच थक्क झाले.

इंडियन आयडॉल १६ च्या मंचावर लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूरने हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमात सहभागी झालेल्या पवनदिपने गाणं म्हणता म्हणता तिला स्टेजवर घेऊन गेला. परंतु, पवनदिपचं हे वागणं काही विशालला पटलं नाही. त्याने लगेचच त्याची नाराजी व्यक्त केली. परंतु, त्याची ही नाराजी खरीखुरी नसून त्याने पवनदिपची मस्करी केली.

नेमकं काय म्हणाला विशाल ददलानी?

''पवनदिप त्याच्या सिजनमध्ये सुद्धा सगळ्या गेस्टला स्टेजवर घेऊन जायचा आणि त्यांच्यासोबत नाचून-गाऊन एन्जॉय करायचा. म्हणजे असं वाटायचं जसं काय आम्ही कोणी इथे नाहीयेच. आणि, आजही काहीही बदललं नाहीये. यावर पवनदिप हसू लागतो. मात्र, यावरच विशाल थांबत नाही. तो लगेच पुढे म्हणतो, हसतोस काय? जरा लाज वाटू दे. इतक्या वर्षानंतर भेटतोय तर निदान मला सुद्धा स्टेजवर नाचायला बोलवायचं ना,'' असं विशाल म्हणाला.


दरम्यान, विशाल ददलानीने पवनदिपची घेतलेली ही फिरकी उपस्थितांना सगळ्यांनाच आवडली आणि सगळेच हसायला लागले. तर दुसरीकडे पवनदिप याच्या वागणुकीत जराही बदल झाला नाहीये. विशाल बोलत असतांना तो फक्त नम्रपणे हसत होता. आणि, त्याच्या याच वागणुकीचं सोशल मीडियावरही कौतुक झालं. इतकी वर्ष झाली. पवनदिपने यश, प्रसिद्धी मिळवली. मात्र, त्याचा नम्रपणा कमी झालेला नाही, असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं.

Web Title : विशाल ददलानी ने इंडियन आइडल के मंच पर पवनदीप राजन को मज़ाकिया अंदाज़ में डांटा।

Web Summary : विशाल ददलानी ने इंडियन आइडल 16 के रियूनियन के दौरान करिश्मा कपूर को मंच पर आमंत्रित करने के लिए पवनदीप राजन को मज़ाकिया अंदाज़ में डांटा, और मज़ाक किया कि पवनदीप के अपरिवर्तित व्यवहार के बावजूद उन्हें अनदेखा किया जा रहा है। उन्होंने पवनदीप को डांस के लिए नहीं बुलाने पर छेड़ा।

Web Title : Vishal Dadlani jokingly scolds Pawandeep Rajan on Indian Idol stage.

Web Summary : Vishal Dadlani playfully chided Pawandeep Rajan for inviting Karisma Kapoor onstage during Indian Idol 16 reunion, joking about being ignored despite Pawandeep's unchanged behavior. He teased Pawandeep about not inviting him to dance.