'इंडियन आयडॉल' फेम गायिका प्राजक्ता शुक्रेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात एन्ट्री, सोज्वळ स्वभावाने जिंकली मनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 22:03 IST2026-01-11T22:02:04+5:302026-01-11T22:03:39+5:30
इंडियन आयडॉल फेम गायिका प्राजक्ता शुक्रे बिग बॉस मराठी ६ च्या घरात दाखल झाली आहे

'इंडियन आयडॉल' फेम गायिका प्राजक्ता शुक्रेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात एन्ट्री, सोज्वळ स्वभावाने जिंकली मनं
'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड प्रिमिअर कलर्स मराठीवर सुरु आहे. सर्वांना या नव्या सीझनची गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. अशातच 'बिग बॉस मराठी ६' मध्ये स्पर्धक म्हणून कोण कोण दिसणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अशातच या नव्या सीझनमध्ये गायिका प्राजक्ता शुक्रे सहभागी झाली आहे. प्राजक्ताच्या एन्ट्रीने घरात एक सोज्वळ आणि सुंंदर आवाज असलेल्या गायिकेची एन्ट्री झाली आहे.
'बिग बॉस मराठी ६'मध्ये सहभागी झालेली प्राजक्ता शुक्रे ही इंडियन आयडॉल सीझन १ मध्ये सहभागी झाली होती. प्राजक्ताने गायक अभिजीत सावंतसोबत स्टेज शेअर केला होता. प्राजक्ता आणि अभिजीत एकाच सीझनमध्ये होते. प्राजक्ताने मराठी आणि हिंदी सिनेमांमधील अनेक गाणी गायली आहेत. प्राजक्ताने गायलेली गाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहेत.
प्राजक्ताने गायलेलं धक्का गाणं महाराष्ट्रात चांगलंच गाजलं. प्राजक्ताने एन्ट्री केल्यावर तिच्या साध्या आणि सोज्वळ स्वभावाने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. प्राजक्ता नम्रपणे सर्वांशी भेटून बोलली आणि तिने सर्वांशी गप्पा मारल्या. आता प्राजक्ता घरात आल्यावर काय रंगत येणार, हे आगामी दिवसांत पाहायला मिळेल.