Indian Idol 12 : आता तरी हाकला रे...! शन्मुखप्रिया व दानिश पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 14:59 IST2021-07-19T14:58:53+5:302021-07-19T14:59:15+5:30
Indian Idol 12: फिनालेच्या काही आठवड्यांआधी नेटक-यांनी घेतला क्लास, मीम्स एकदा पाहाच

Indian Idol 12 : आता तरी हाकला रे...! शन्मुखप्रिया व दानिश पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर
‘इंडियन आयडल 12’चा (Indian Idol 12) फिनाले काही आठवड्यांवर येऊन ठेपलाय आणि अशात शोचे सर्व स्पर्धक जीव तोड मेहनत घेऊन प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. आत्तापर्यंत शोमधून अनेक स्पर्धक बाहेर पडलेत.पण सवाई भट, नचिकेत लेले, अंजली गायकवाड, आशीष कुलकर्णी हे स्पर्धक बाहेर झाले तेव्हा लोकांचा राग अनावर झाला आणि या रागाचा सर्वाधिक फटका शन्मुखप्रिया (Shanmukha Priya) व मोहम्मद दानिश (Mohd Danish) या दोन स्पर्धकांना बसला. या दोघांना लवकरात लवकर शोमधून हाकला, अशी मागणी सोशल मीडियावर लोकांनी केली.
आता पुन्हा एकदा शन्मुख प्रिया व दानिश दोघेही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. या दोघांना इविक्शनपासून वाचवण्यासाठी शो मेकर्सनी अनेक टॅलेंटेड स्पर्धकांना बाहेर फेकल्याचा नेटक-यांचा आरोप आहे. काल रविवारी प्रसारित झालेल्या एपिसोडनंतर तर नेटक-यांचा पारा आणखीच चढलेला दिसतोय.
शन्मुखप्रिया व दानिश यांच्यावरचे मीम्स व्हायरल होत आहेत आणि दोघांनाही जबरदस्त ट्रोल केले जातेय.
Me seeing loudspeakers Shanmukhpriya and Danish in every next episode of #IndianIdol2021pic.twitter.com/XD8SKiLbfx
— Satyam Singh (@MyFreakyTweets) July 17, 2021
Why no elimination this week.? I think @shanmukpriya got the lowest votes.. #IndianIdol2021#IndianIdol#SonyTV
— Dr Gautam/ಡಾ॥ ಗೌತಮ್ 🇮🇳 (@DrgautamSk) July 18, 2021
‘या दोन लाऊडस्पीकर्सला प्रत्येक एपिसोडमध्ये बघावे लागते. हा शो बायस्ड आहे. मी याचा बहिष्कार करतो,’असे एका युजरने लिहिले.
या आठवड्यात एलिमिनेशन का झालं नाही? शन्मुप्रियाला आता बाहेर काढायला हवं, असं अन्य एका युजरनं लिहिलं.
After hearing besura song of Danish,
— Shant (@move123456789) July 18, 2021
Feeling....#IndianIdol#indianidol12#IndianIdol2021pic.twitter.com/42NqmSthbB
#ShanmukhaPriya just howls an shouts in the name of singing.
— *AMIT* (@AmitMah56310241) July 17, 2021
Evict karo ise
People of India know the truth pic.twitter.com/dkY2st7t3M
#IndianIdol2021 Aaj ka pura show scripted tha... Dusre contestents ko pramotr krne k liye and pawandeep ko nicha dikhane ke liye..
— Arpit thakkar (@arpit_thakkar) July 18, 2021
Phir bhi pawandeep ne ekdum soulful sing kiya.. Truely gem..
Makers ne usse insta post bhi krvaya.. How cruel they are...
पवनदीप गाणं विसरला!
रविवारच्या एपिसोडमध्ये बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्र व अनीता राज हे दोघेही स्पेशल गेस्ट म्हणून ‘इंडियन आयडल 12’मध्ये पोहोचले होते. पवनदीपनं या दोघांसमोर ‘मेरा गीत अमर कर दो’ हे गाणं सादर केलं. मात्र गाताना अचानक पवनदीप गाण्याचे बोल विसरला. यावेळी सायली कांबळे लगेच उभी झाली आणि तिनं एक ओळ गात पवनदीपला गाण्याची आठवण करून दिली. पण पवनदीप लिरिक्स विसरला हे पाहून सगळे जजेस स्तब्ध झालेत. सोशल मीडियावर लगेच याची चर्चा रंगली. ही चूक पवनदीपला महागात तर पडणार नाही? तो शोच्या बाहेर तर जाणार नाही? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली.
येत्या 15 आॅगस्टला ‘इंडियन आयडल 12’ फिनाले आहे. पवनदीप आणि अरूणिता कांजीलाल हे दोघे शो विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. अशात पवनदीपच्या चुकीने त्याच्या चाहत्यांची धाकधूक वाढवली आहे.