Indian Idol 12 Finale : पवनू जिंकला रे! पवनदीप राजन ठरला ‘इंडियन आयडल12’चा विजेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 00:07 IST2021-08-15T23:53:57+5:302021-08-16T00:07:51+5:30

Indian Idol 12 Finale : ‘इंडियन आयडल 12’ या देशातील सर्वात लोकप्रिय शोचा विजेता कोण होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असतानाच 12 च्या ठोक्याला विजेत्याच्या  नावाची घोषणा झाली.

Indian Idol 12 Finale Pawandeep Rajan is the winner of the show | Indian Idol 12 Finale : पवनू जिंकला रे! पवनदीप राजन ठरला ‘इंडियन आयडल12’चा विजेता

Indian Idol 12 Finale : पवनू जिंकला रे! पवनदीप राजन ठरला ‘इंडियन आयडल12’चा विजेता

ठळक मुद्देइंडियन आयडल 12 च्या  ग्रेट ग्रँड फिनालेमध्ये अन्नू कपूर यांच्यासोबत स्पर्धक व शोच्या जजेसनी अंताक्षरीही खेळली.

गेल्या वर्षी सुरू झालेला ‘इंडियन आयडल 12’  (Indian Idol 12 Finale ) या देशातील सर्वात लोकप्रिय शोचा विजेता कोण होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असतानाच 12 च्या ठोक्याला विजेत्याच्या  नावाची घोषणा झाली. पवनदीप राजन हा  ‘इंडियन आयडल 12’ चा विजेता ठरला. तर अरूणिता कांजीलाल ही उपविजेती ठरली. पवनदीप राजन व अरूणिता हे दोघेही शोच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. अखेर चाहत्यांच्या मतांच्या आधारावर पवनदीपने बाजी मारली. ‘इंडियन आयडल 12’ ची चकाकती ट्राफी आणि 25 लाखांच्या धनादेश देऊन पवनदीपला गौरविण्यात आले.

असा रंगला ग्रेट ग्रँड फिनाले
  जज सोनू कक्कर, अनु मलिक आणि हिमेश रेशमिया यांच्यासह आज इंडियन आयडल 12 चा 12 तासांचा  ग्रेट ग्रँड फिनाले रंगला.
चित्रपट जगतातील अनेक सेलिब्रिटींनी यावेळी हजेरी लावली.जावेद अली, मनोज मुंतशीर, उदित नारायण, कुमार सानू, मिका सिंग, अल्का याग्निक अशा अनेक दिग्गजांनी  ग्रेट ग्रँड फिनालेमध्ये धमाकेदार परफॉर्मन्सही दिलेत.  
या शोच्या माजी स्पर्धकांनीही एकापाठोपाठ एक दमदार परफॉर्मन्स दिले. प्रत्येकाने अनु मलिकसोबतही परफॉर्मन्स दिले. प्रत्येकजण गात असताना, अनु मलिक पियानो वाजवत होते. सगळेच कलाकार धमाल करताना दिसले़ सुखविंदर सिंह यांना मोहम्मद दानिशसोबत ‘लगन लागी’ हे गाणे सादर केले़  हिमेश रेशमियाने निहालसोबत परफॉर्म दिला. हिमेशने २ सर्वप्रथम ‘चलाओं ना नॅनो से बाण रें’ हे गाणं गायले. तर निहालने ‘तेरा चेहरा’ हे गाणं गायले.


 
अल्का याग्निक आणि पवनदीप राजन यांची जुगलबंदीही यावेळी पाहायला मिळाली. ‘राहों में उनसे मुलाकात हो गई’ हे गाणं सादर करत त्यांनी सर्वांची मने जिंकली.
मिका सिंगने  प्रथम सर्व महिला स्पर्धकांसोबत, नंतर पुरुष स्पर्धकांसोबत परफॉर्मन्स दिले आणि शेवटी त्याने सर्वांसोबत रॉकिंग परफॉर्मन्स दिला.

रंगली अंताक्षरी... अनु मलिकच्या टीमची   बाजी
इंडियन आयडल 12 च्या  ग्रेट ग्रँड फिनालेमध्ये अन्नू कपूर यांच्यासोबत स्पर्धक व शोच्या जजेसनी अंताक्षरीही खेळली. अनु मलिकच्या संघाने ही स्पर्धा जिंकली. त्यांच्या संघाला विजयावर विशेष भेटवस्तू सुद्धा मिळाली. 

Web Title: Indian Idol 12 Finale Pawandeep Rajan is the winner of the show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.