Indian Idol 12 फेम पवनदीप राजन आणि अरूणिता कांजिलाल दिसले रोमाँटिक अदांजात, व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 16:03 IST2022-03-01T16:03:00+5:302022-03-01T16:03:37+5:30

Indian Idol 12 fame Pawandeep Rajan & Arunita Kanjilal: पवनदीप राजन आणि अरूणिता कांजिलाल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Indian Idol 12 fame Pawandeep Rajan and Arunita Kanjilal appeared in a romantic affair, the video went viral | Indian Idol 12 फेम पवनदीप राजन आणि अरूणिता कांजिलाल दिसले रोमाँटिक अदांजात, व्हिडीओ झाला व्हायरल

Indian Idol 12 फेम पवनदीप राजन आणि अरूणिता कांजिलाल दिसले रोमाँटिक अदांजात, व्हिडीओ झाला व्हायरल

इंडियन आयडॉल १२ (Indian Idol 12) आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय सीझन ठरला. या सीझनमध्ये प्रेक्षकांना शोमध्ये एकापेक्षा एक दमदार स्पर्धक पाहायला मिळाले. तसेच प्रेक्षकांना खिळवून ठेवले ते म्हणजे लोकप्रिय स्पर्धक पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आणि अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal) या जोडीने. पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांना इंडियन आयडॉल १२ मधून खूप प्रेम मिळाले. ही जोडी एकत्र आल्यावर प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. आता नुकताच या दोघांचा एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघेही रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत.

अलीकडेच पवनदीप राजनच्या 'याद' या गाण्याचा एक बिहाइंड द सीनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. पण दोघांच्या फॉलोअर्सना त्या क्लिपिंगमध्ये रस होता ज्यामध्ये ते शूटिंगदरम्यान व्हिडिओमध्ये अरुणिताचा हात धरताना दिसत आहेत. त्यांचे एकत्र क्षण एका चाहत्याने नवीन पोस्टमध्ये शेअर केले आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांकडून खूप छान कमेंट्स येत आहेत. एका चाहत्याने लिहिले, 'प्रिय जोडपे... नेहमी आनंदी राहा.' दुसर्‍याने लिहिले की, 'अरुणदीपच्या चेहऱ्यावरचे हास्य सांगत आहे की सर्व आनंद एकमेकांसोबत आहे.'


अरुणिता काही वेळापूर्वी उत्तराखंडमध्ये पवनदीपच्या बहिणीच्या लग्नालाही गेली होती. यादरम्यान अरुणिताने पवनदीप राजनच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवला आणि सर्व विधींमध्ये भाग घेतला. अनेक फोटो आणि व्हिडिओमध्ये तो पवनच्या बहिणीसोबत दिसत होता. इंडियन आयडॉल १२ मध्ये पवनदीप आणि अरुणिता यांची चांगली बॉन्डिंगही होती. अनेक दिवसांपासून त्यांच्या डेटिंगच्या बातम्यादेखील समोर येत होत्या, मात्र यामध्ये काहीही तथ्य नसून दोघे चांगले मित्र आहेत आणि यापुढेही राहतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Indian Idol 12 fame Pawandeep Rajan and Arunita Kanjilal appeared in a romantic affair, the video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.