मन मस्त मगन !! अरुणिता-पवनदीपचा तो व्हिडीओ झाला व्हायरल; पुन्हा एकत्र दिसली जोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 01:06 PM2022-04-28T13:06:12+5:302022-04-28T13:06:49+5:30

Arunita kanjilal: या जोडीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे.

indian idol 12 fame arunita kanjilals post a cute birthday wish for pawandeep rajan | मन मस्त मगन !! अरुणिता-पवनदीपचा तो व्हिडीओ झाला व्हायरल; पुन्हा एकत्र दिसली जोडी

मन मस्त मगन !! अरुणिता-पवनदीपचा तो व्हिडीओ झाला व्हायरल; पुन्हा एकत्र दिसली जोडी

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील इंडियन आयडॉल १२ (Indian Idol 12) हा रिअॅलिटी शो आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय सीझन ठरला.  या सीझनमधील प्रत्येक स्पर्धक त्यांच्या दमदार परफॉर्मेन्समुळे चर्चेत राहिला. तर, काही स्पर्धक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आले. यातलीच एक जोडी म्हणजे पवनदीप राजन (pawandeep rajan) आणि अरुणिता कांजीलाल (arunita kanjilal). हा शो सुरु झाल्यापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. इतकंच नाही तर हा शो संपल्यानंतरही या जोडीला एकत्र पाहण्यात आलं. त्यामुळे त्यांच्यात नक्कीच मैत्री पलिकडचं नातं असल्याचं म्हटलं जातं. यामध्येच आता अरुणिताने पवनदीपच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यासोबतचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली पवनदीप आणि अरुणिता ही जोडी कायम एकमेकांसोबतच्या म्युझिक अल्बमचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. मात्र, यावेळी अरुणिताने पवनदीपच्या वाढदिवसानिमित्त एक अनसीन व्हि़डीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ही जोडी मन मस्त मगन या गाण्यावर ड्युएट गाताना दिसत आहेत.

अरुणिताने इन्स्टाग्रामवर पवनदीपचे अनेक फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात तिने शेअर केलेला थ्रोबॅक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्यातील एकी दिसून येत आहे.

दरम्यान, या जोडीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. अरुणिता आणि पवनदीप ही जोडी हा शो सुरु झाल्यापासून लोकप्रिय ठरली आहे. इतकंच नाही तर त्यांच्यात काही तरी खास नातं असल्याचंही म्हटलं जातं. मात्र, या दोघांनीही याविषयी कधीच जाहीरपणे भाष्य केलं नाही.
 

Web Title: indian idol 12 fame arunita kanjilals post a cute birthday wish for pawandeep rajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.