Indian Idol 11: नेहा कक्करला स्पर्धकाने बळजबरीने किस केले तेव्हा परीक्षकांनी का घेतली बघ्याची भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 11:46 IST2019-10-22T11:45:31+5:302019-10-22T11:46:50+5:30

अलीकडे ऑडिशनदरम्यान असे काही झाले की, परिक्षकांसह प्रेक्षकांनाही धक्का बसला. होय, ऑडिशनमध्ये पोहोचलेल्या एका स्पर्धकाने  चक्क नेहा कक्करला बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला.

indian idol 11 vishal dadlani reply on man forcibly kissing neha kakkar | Indian Idol 11: नेहा कक्करला स्पर्धकाने बळजबरीने किस केले तेव्हा परीक्षकांनी का घेतली बघ्याची भूमिका?

Indian Idol 11: नेहा कक्करला स्पर्धकाने बळजबरीने किस केले तेव्हा परीक्षकांनी का घेतली बघ्याची भूमिका?

ठळक मुद्देनुकताच सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात होता.

‘इंडियन आयडल’ या सिंगींग रिअ‍ॅलिटी शोचा 11 वा सीझन सुरु झाला आहे. सध्या या शोचे ऑडिशन सुरु आहे. शोचे परिक्षक नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि अनु मलिक नेहमीप्रमाणे ऑडिशन राऊंडमध्ये मौज मस्ती करताना दिसत आहेत. अनेक स्पर्धकांचे धमाकेदार परफॉर्मन्सही पाहायला मिळत आहेत. पण अलीकडे ऑडिशनदरम्यान असे काही झाले की, परिक्षकांसह प्रेक्षकांनाही धक्का बसला. होय, ऑडिशनमध्ये पोहोचलेल्या एका स्पर्धकाने  चक्क नेहा कक्करला बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला. क्षणात हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला. अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नेहाला एक स्पर्धक बळजबरीने किस करतोय, हे पाहूनही विशाल ददलानी आणि अनु मलिक या दोघांनी बघ्याची भूमिका का घेतली? ते गप्प का राहिलेत? असे सवाल नेटक-यांनी केलेत. एका चाहत्याने थेट याबाबत  ट्विट करुन  विशाल ददलानीला जाब विचारला. चाहत्याच्या या प्रश्नानंतर विशालने याबाबत खुलासा केला आहे.




‘ हा प्रकार आमच्यासाठीही शॉकिंग होता. यानंतर लगेच मी पोलिसांना बोलवण्याचा सल्ला दिला होता. मात्र नेहाने त्या स्पर्धकाला जाऊ दिले. त्या स्पर्धकाला मानसोपचार तज्ञाची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही त्याची मदत नक्कीच करु’, असे उत्तर विशालने स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण
 नुकताच सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात होता. या व्हिडीओत एक स्पर्धक नेहाला बळजबरीने गालावर किस करताना दिसला होता.
 एक स्पर्धक खूप सा-या भेटवस्तू घेऊन ऑडिशनसाठी पोहोचतो. आपल्याजवळच्या सगळ्या भेटवस्तू तो नेहाला देता. नेहा खूश होते आणि आनंदाच्या भरात त्याला मिठी मारते. पण तो स्पर्धक अचानक नेहाला गालावर किस करतो. शो होस्ट आदित्य नारायण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. नेहा सुद्धा लगेच बाजूला होते.  

Web Title: indian idol 11 vishal dadlani reply on man forcibly kissing neha kakkar