पाकिस्तानी मालिकेत पहिल्यांदा झळकणार भारतीय अभिनेत्री !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 11:35 IST2016-07-28T06:05:27+5:302016-07-28T11:35:27+5:30

भारतीय टीव्ही सृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा असलेली अभिनेत्री सारा खान लवकरच पाकिस्तानी मालिकेत काम करणार आहे. अशाप्रकारे पाकिस्तानी टीव्ही मालिकेत ...

Indian actress to be seen first in Pakistan series | पाकिस्तानी मालिकेत पहिल्यांदा झळकणार भारतीय अभिनेत्री !

पाकिस्तानी मालिकेत पहिल्यांदा झळकणार भारतीय अभिनेत्री !

tyle="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">भारतीय टीव्ही सृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा असलेली अभिनेत्री सारा खान लवकरच पाकिस्तानी मालिकेत काम करणार आहे. अशाप्रकारे पाकिस्तानी टीव्ही मालिकेत झळकणारी सारा ही पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरणार आहे. पाकिस्तानी अभिनेता नूर हसनसह ती काम करणार असून हा शो एआरवाय डिजिटल या पाकिस्तानी चॅनलवर प्रसारीत होईल. सध्या सारा 'कवच' या शोमध्ये मंजुलिका नावाची भूमिका साकारतेय. हा शो लवकरच ऑफ एअर होणार असून त्यानंतर सारा पाकिस्तानला रवाना होणार आहे. 'बिदाई' मालिकेपासून आपल्या अभिनयानं भारतीय रसिकांची मनं जिंकणा-या सारानं पाकिस्तानी रसिकांवरही मोहिनी घालावी अशीच काहीशी आस तिच्या फॅन्सना असेल. 

Web Title: Indian actress to be seen first in Pakistan series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.