'पुन्हा कर्तव्य आहे' उत्कंठावर्धक वळणावर, वसु आकाशला देऊ शकले का आयुष्यात जागा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 12:26 PM2024-04-13T12:26:09+5:302024-04-13T12:27:15+5:30

'पुन्हा कर्तव्य आहे' (Punha Kartavya Aahe) या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत आकाश आणि वसूची कथा दाखवण्यात आली आहे.

In the exciting twist of 'Punha Kartavya Aahe', can Vasu give Akash a place in life? | 'पुन्हा कर्तव्य आहे' उत्कंठावर्धक वळणावर, वसु आकाशला देऊ शकले का आयुष्यात जागा?

'पुन्हा कर्तव्य आहे' उत्कंठावर्धक वळणावर, वसु आकाशला देऊ शकले का आयुष्यात जागा?

झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' (Punha Kartavya Aahe) या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत आकाश आणि वसूची कथा दाखवण्यात आली आहे. या मालिकेतून अभिनेता अक्षय म्हात्रे (Akshay Mhatre) आणि अक्षया हिंदळकर(Akshaya Hindalkar) ही नवी कोरी जोडी भेटीला आली आहे. पहिल्या दिवसापासूनचा 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. 

'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत आकाश आणि वसूच्या साखरपुड्याची लगबग सुरु आहे. तेव्हाच गुरुजी सांगतात दोघांच्याही पत्रिका छान जुळतायेत, पण एक छोटी अडचण आहे पण एक हवन केला तर तो दोषही निघून जाईल, घरच्यांच्या मनधरणीनंतर दोघेही देवळात जायला तयार होतात. अवनीच्या ठरल्या प्लानप्रमाणे आकाश आणि वसु एकाच मंदिरात हवन करण्यासाठी जातात. 

तर दुसरीकडे माधव सांगतो की वसु आणि आकाश यांच्या साखरपुड्याचा उद्याचा मुहूर्त निघाला आहे, कारण त्यानंतर पुढचे सहा महिने मुहूर्त नाही. दोन्ही घरात साखरपुड्याची लगबग सुरू आहे.  ठाकूर फॅमिली मध्ये उत्साहाचं वातावरण  आहे  सगळेजण साखरपुड्यासाठी तयार होतात आकाशला बघून सगळे खुश होतात. पिंकी वसुंधराला तयार करते. रानडे फॅमिली मध्ये सगळे खुश आहेत. पण  बाजूला ठेवलेली रिंग बघून वसुंधराला  तिचा भूतकाळ आठवतो  आता वसु आकाशला आपल्या आयुष्यात  जागा देऊ शकेल का? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: In the exciting twist of 'Punha Kartavya Aahe', can Vasu give Akash a place in life?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.