मी खलनायिका नाहीये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 16:27 IST2016-09-19T10:57:12+5:302016-09-19T16:27:12+5:30
काला टीका या मालिकेत गौरीची भूमिका साकारणारी फेनिल उमरिगर लवकरच ही मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेत फेनिलची ...

मी खलनायिका नाहीये
क ला टीका या मालिकेत गौरीची भूमिका साकारणारी फेनिल उमरिगर लवकरच ही मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेत फेनिलची व्यक्तिरेखा नकारात्मक झाल्याचे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. व्यक्तिरेखेला देण्यात आलेली कलाटणी फेनिलला पटलेली नाहीये. त्यामुळे तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि तसे तिने निर्मात्यांना कळवलेदेखील आहे. मालिका सोडण्यापूर्वी काही महिन्यांची नोटिस देणे गरजेचे असते. त्यामुळे ती डिसेंबरपर्यंत मालिकेचे चित्रीकरण करणार आहे. पण त्याचदरम्यान तिची भूमिका सकारात्मक करण्यात आल्यास ती तिचा निर्णयही बदलू शकते असे म्हटले जात आहे.