"तुम्ही टिपिकल नवरा नाही तर...", वटपौर्णिमेच्या निमित्ताने वैष्णवीची किरणसाठी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:34 IST2025-06-10T17:33:47+5:302025-06-10T17:34:14+5:30
Vaishnavi Kalyankar And Kiran Gaikwad : अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरने इंस्टाग्रामवर पती किरण गायकवाडसोबतचे फोटो शेअर करत वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

"तुम्ही टिपिकल नवरा नाही तर...", वटपौर्णिमेच्या निमित्ताने वैष्णवीची किरणसाठी खास पोस्ट
'देवमाणूस' (Devmanus) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) ने मागील वर्षी १४ डिसेंबर रोजी अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर(Vaishnavi Kalyankar)सोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने अभिनेत्रीने किरणसाठी पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरने इंस्टाग्रामवर पती किरण गायकवाडसोबतचे फोटो शेअर करत वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने पोस्टमध्ये लिहिले की, खरंच मी खूप नशीबवान आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आलात... कारण तुम्ही टिपिकल नवरा नाही तर माझा मित्र पण आहात.... जो मला खूप समजून घेतो.... आणि त्यामुळेच लग्नानंतरच आयुष्यही खूप सुंदर वाटतं.... लव्ह यू किरण गायकवाड. वटपौर्णिमेच्या शुभेच्छा.... वैष्णवीच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांची पहिली भेट 'देवमाणूस' या मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, किरण गायकवाडने 'लागिर झालं जी', 'देवमाणूस' या मालिकांबरोबरच अनेक मालिकांमध्ये काम केले. मराठी सिनेमांमध्येही त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'चौक', 'फकाट', 'बघतोस काय मुजरा कर' आणि 'डंका हरिनामाचा' या सिनेमांमध्ये तो झळकला आहे. तर वैष्णवी कल्याणकर सुद्धा अभिनेत्री असून तिने 'तू चाल पुढं', 'देवमाणूस २' आणि 'तिकळी' या मालिकांमध्ये काम केलंय.