ठरलं तर मग! जुई गडकरी खऱ्या आयुष्यात या तारखेला बांधणार लग्नगाठ, खुलासा करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 12:18 IST2023-09-06T12:17:59+5:302023-09-06T12:18:32+5:30

Jui Gadkari : अभिनेत्री जुई गडकरी खऱ्या आयुष्यात लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अखेर या चर्चेवर अभिनेत्रीने मौन सोडले आहे.

If it is decided then! Jui Gadkari will tie the knot on this date in real life, revealing... | ठरलं तर मग! जुई गडकरी खऱ्या आयुष्यात या तारखेला बांधणार लग्नगाठ, खुलासा करत म्हणाली...

ठरलं तर मग! जुई गडकरी खऱ्या आयुष्यात या तारखेला बांधणार लग्नगाठ, खुलासा करत म्हणाली...

स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सायली आणि अर्जुनची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. या मालिकेत सायलीची भूमिका अभिनेत्री जुई गडकरी हिने साकारली आहे तर अर्जुनची भूमिका अभिनेता अमित भानुशालीने निभावली आहे. दरम्यान आता अभिनेत्री जुई गडकरी खऱ्या आयुष्यात लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान आता खुद्द अभिनेत्रीनेच तिच्या लग्नाबाबत एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन-सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली या दोघांनी हंच मीडियाला नुकतीच मुलाखत दिली. त्यावेळी जुईने तिच्या लग्नाची तारीख सांगितली. हो तुम्ही वाचलंय ते खरंय... जुई गडकरी पुढील वर्षी २०२४ ला लग्न करणार आहे. तिने लग्नाची तारीखदेखील सांगितली. तिने ४ फेब्रुवारीला लग्न करणार असल्याचे या मुलाखतीत म्हटले आहे. 

लग्नाबाबतची अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक

जुईने लग्नाची तारीख जाहीर केल्यामुळे तिचे चाहते खूश झाले आहेत. तिच्या म्हणण्याप्रमाणे यंदाचा तिचा व्हॅलेंटाईन डे चांगला होणार आणि आयुष्याला नवी सुरुवात करणार आहे. लग्नानंतर जुईला नवरा आणि तिच्या नव्या संसाराला वेळ द्यायचा आहे. तिचा होणारा नवरा कोण आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र तिचे चाहते लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. 
 

Web Title: If it is decided then! Jui Gadkari will tie the knot on this date in real life, revealing...