"गोऱ्या मुलींना सहानुभूती लवकर मिळत असेल...", ऋतुजा बागवेनं सांगितलं त्या अनुभवाबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 11:18 IST2025-09-09T11:18:12+5:302025-09-09T11:18:46+5:30

Rutuja Bagwe : ऋतुजा बागवे हिने एका मुलाखतीत करिअर, खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

"I think fair girls get sympathy sooner...", Rutuja Bagwe said about that experience | "गोऱ्या मुलींना सहानुभूती लवकर मिळत असेल...", ऋतुजा बागवेनं सांगितलं त्या अनुभवाबद्दल

"गोऱ्या मुलींना सहानुभूती लवकर मिळत असेल...", ऋतुजा बागवेनं सांगितलं त्या अनुभवाबद्दल

अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा माध्यमात काम केले आहे. सध्या ती हिंदी मालिकेत काम करत आहे. नुकतेच तिने व्यवसाय क्षेत्रातही पदार्पण केलंय. तिने फुडचं पाऊल नावाचं हॉटेल सुरू केलं आहे. दरम्यान आता तिने एका मुलाखतीत करिअर, खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. 

ऋतुजा बागवे हिने नुकतेच आरपार ऑनलाइनला मुलाखत दिली. त्यात ती म्हणाली की, ''अनन्या नाटकाच्या वेळी असं घडलं. सर मला म्हणाले तू अनन्या नाही दिसत. तू... तू... तू ना अशी मला लाघवी, गोड आणि अशी हवीय अनन्या. तर म्हटलं का सर नॉर्मल दिसणाऱ्या मुलींच्या आयुष्यात असं काही घडत नाही का मी म्हटलं कलाकार म्हणून ही तर माझ्यावर आणखी जबाबदारी आहे की मी माझ्या त्या २-४ सीनमध्ये मी लोकांना माझ्या प्रेमात पाडेन कामाने. जर सहानुभूती गोऱ्या आणि एक विशिष्ट सुंदर दिसणाऱ्या मुलींना सहानुभूती पटकन मिळत असेल तर कलाकार म्हणून ती सहानुभूती मी माझ्या कामातून कमवण्याचा प्रयत्न करते. त्यांनाही माझं काम आवडलं आणि ते असं म्हणालेले की मला ना असं डोक्यात आहे की ती ना पायाने चादरीची घडी घालेल वगैरे.'' 

''हे अजून किती काळ सिद्ध करावं लागणारं...''
ती पुढे म्हणाली की, ''मी घरी गेले. म्हटलं हीच ती वेळ. आता जर मी ही घडी चादरीची घडी घालून ह्यांना व्हिडीओ पाठवला तर मी त्यांचा विश्वास जिंकेन. मी लगेच घरी गेले. चादरीची घडी केली आणि व्हिडीओ पाठवून दिला. नुसती घडी नाही केली तर असं उचलून वगैरे वर ठेवलं आणि व्हिडीओ पाठवला. सर खूश तिकडून मग त्यांना एक वाटलं की हा ही करेल. ही अनन्या आहे माझी. तर मला असं वाटतं हे जी मेहनत आहे आपण योग्य आहोत... पात्र आहोत हे अजून किती काळ सिद्ध करावं लागणारे पण आता मी अशी आहे की ओके मी सिद्ध करायला तयार आहे.''

Web Title: "I think fair girls get sympathy sooner...", Rutuja Bagwe said about that experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.