"खूप काही लिहायचं आहे पण डोळ्यातलं पाणी..", 'लाखात एक आमचा दादा'ला निरोप देताना ईशा संजयची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:57 IST2025-09-19T13:57:02+5:302025-09-19T13:57:27+5:30

'Lakhat Ek Aamcha Dada' Serial : 'लाखात एक आमचा दादा' मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. या मालिकेत 'राजश्री' म्हणजेच 'राजू' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा संजय हिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे.

''I have a lot to write but tears in my eyes..'', Isha Sanjay's emotional post while saying goodbye to 'Lakhat Ek Aamcha Dada' Serial | "खूप काही लिहायचं आहे पण डोळ्यातलं पाणी..", 'लाखात एक आमचा दादा'ला निरोप देताना ईशा संजयची भावुक पोस्ट

"खूप काही लिहायचं आहे पण डोळ्यातलं पाणी..", 'लाखात एक आमचा दादा'ला निरोप देताना ईशा संजयची भावुक पोस्ट

'लाखात एक आमचा दादा' ('Lakhat Ek Aamcha Dada' Serial) ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका सूर्यकांत उर्फ दादा आणि त्याच्या चार बहिणींच्या प्रेमकथेवर आधारित आहे, जिथे तो आपल्या बहिणींना चांगल्या आणि श्रीमंत कुटुंबात लग्न लावण्यासाठी आपले जीवन समर्पित करतो. सध्या ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केल्या आहेत. दरम्यान या मालिकेत 'राजश्री' म्हणजेच 'राजू' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा संजय हिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे. 

ईशा संजयने 'लाखात एक आमचा दादा' मालिकेतील फोटो शेअर करत लिहिले की, ''राजश्री जगताप. माझी पहिली ओळख. माझी कॅमेराच्या जगातली पहिली मैत्रीण. आणि पहिलं आयुष्यभर विशेष राहतं. कोणी मला आता विचारलं राजश्री कशी होती गं? मी म्हणेन, साधेपणातलं सौंदर्य म्हणजे राजू. निःस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम, संयम, कष्ट करण्याची अमाप ताकद आणि बेधडकपणा मला तिने शिकवला. ''


तिने पुढे म्हटलं की, ''खूप काही लिहायचं आहे पण डोळ्यातलं पाणी लिहू देत नाहीये… कृष्णामातेचा आशीर्वाद पाठीशी घेऊन, आठवणींची ओंजळ भरून, कमाल अनुभव डोळ्यात साठवून पुढच्या प्रवासाला निघाले आहे. असंच प्रेम असू दे, नवीन मैत्रिणीला घेऊन पुन्हा येईन भेटायला लवकरच……''

Web Title: ''I have a lot to write but tears in my eyes..'', Isha Sanjay's emotional post while saying goodbye to 'Lakhat Ek Aamcha Dada' Serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.