उषा उथपला डोळ्यांसमोर ठेवूनच या गाण्याला ए. आर. रेहमानने दिले संगीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 07:15 IST2019-02-02T07:15:00+5:302019-02-02T07:15:00+5:30

स्टार प्लसवरील बहुप्रतीक्षित ‘द व्हॉइस’ या आगामी कार्यक्रमाच्या प्रसारणाचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे, तसतशी या कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता वाढत चालली आहे.

I had actually composed the song ‘Tu Bole glass’ keeping her in mind, says A.R Rahman | उषा उथपला डोळ्यांसमोर ठेवूनच या गाण्याला ए. आर. रेहमानने दिले संगीत

उषा उथपला डोळ्यांसमोर ठेवूनच या गाण्याला ए. आर. रेहमानने दिले संगीत

ठळक मुद्दे ‘द व्हॉइस’ शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

स्टार प्लसवरील बहुप्रतीक्षित ‘द व्हॉइस’ या आगामी कार्यक्रमाच्या प्रसारणाचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे, तसतशी या कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता वाढत चालली आहे. देशाचा गायनाच्या क्षेत्रातील नवा तारा कोण, याचा शोध घेण्यास देशातील अव्वल संगीतकार या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. आता या कार्यक्रमाची उत्सुकता अधिकच वाढविताना ज्येष्ठ गायिका उषा उथप या पहिल्या विशेष परीक्षक म्हणून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाचे सुपरगुरू महान संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासह अदनान सामी, कनिका कपूर, हर्षदीप कौर आणि अरमान मलिक या नामवंत गायकांच्या प्रशिक्षकांमध्ये आता उषा उथपही आल्याने या कार्यक्रमात संगीताचा जलसाच सुरू होईल. या कार्यक्रमात सहभागी होता आल्यामुळे आनंदित झालेल्या उषा उथपने आपली काही खास गाणीही यावेळी गायली. त्यांच्या सहभागामुळे ए. आर. रेहमान हेही विशेष खुशीत होते. आपल्याला उषा उथप यांचा आवाज फार आवडतो आणि आपल्याला त्यामुळे एक वेगळीच प्रेरणा मिळते, असे रेहमान यांनी यावेळी सांगितले. किंबहुना ‘तू बोले ग्लास’ या गाण्याला आपण उषा उथप यांनाच डोळ्यासमोर ठेवून संगीत दिले होते, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
या संदर्भात रेहमान म्हणाले, “उषाजींच्या आवाजाने मला प्रेरणा दिली होती आणि ‘तू बोले ग्लास’ या गाण्याला मी त्यांचा आवाज डोळ्यांसमोर ठेवूनच संगीत दिले होते. ते गाणे जरी प्रत्यक्षात ध्वनिमुद्रित झाले नाही, तरी मला त्यांच्याबरोबर अन्य काही गाण्यांवर काम करता आलं, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.”
‘स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमात भारतातील सर्व लोकप्रिय संगीतकारांना एकत्र पाहणे ही प्रेक्षकांसाठी दृकश्राव्य पर्वणी ठरेल, यात शंकाच नाही.
3 फेब्रुवारी 2019 पासून शनिवार-रविवारी रात्री 8.00 वाजता पाहा ‘द व्हॉइस’ फक्त स्टार प्लसवर पाहायला मिळणार आहे.
 

Web Title: I had actually composed the song ‘Tu Bole glass’ keeping her in mind, says A.R Rahman