"मी मराठी आहे असं वाटतं, पण ...", 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शुभांगी अत्रेनं केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:59 IST2025-12-11T16:58:29+5:302025-12-11T16:59:03+5:30
लोकप्रिय मालिका 'भाभीजी घर पर हैं' (Bhabhiji Ghar Par Hai)मधून अंगुरी भाभीच्या भूमिकेतून अभिनेत्री शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) घराघरात पोहचली. तिने आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे

"मी मराठी आहे असं वाटतं, पण ...", 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शुभांगी अत्रेनं केला खुलासा
हिंदी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'भाभीजी घर पर हैं' (Bhabhiji Ghar Par Hai)मधून अंगुरी भाभीच्या भूमिकेतून अभिनेत्री शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) घराघरात पोहचली. तिने आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत शुभांगी अत्रेने खुलासा केला की, तिच्या आडनावामुळे अनेकांना ती महाराष्ट्रीयन असल्याचं वाटतं. पण ती मराठी नाही आहे.
शुभांगी अत्रे मूळची मध्यप्रदेशची आहे. तिने एमबीएमध्ये मास्टर्स केलं आहे. एमबीएचं शिक्षण घेतल्यांनंतर शुभांगी अत्रेनं अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी मुंबईला आली. शुभांगी अत्रेला 'भाभीजी घर पर है' मुळे ओळख मिळाली. २०१६ साली शिल्पा शिंदेने ही मालिका सोडल्यानंतर तिच्या जागी शुभांगी अत्रेची वर्णी लागली होती. तेव्हापासून ती अंगुरी भाभीच्या भूमिकेतून रसिकांचं मनोरंजन करत होती. पण आता काही दिवसांपूर्वीच तिने मालिकेतून एक्झिट घेतली आहे.
"माझ्या आडनावामुळे मी मराठी आहे, असं अनेकांना वाटतं. पण..''
नुकतेच शुभांगी अत्रेने महाराष्ट्र टाइम्सला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या आडनावावरून ती अनेकांना मराठी असल्याचं वाटतं, पण ती नाही आहे, असं सांगितलं. ती म्हणाली की, "माझ्या आडनावामुळे मी मराठी आहे, असं अनेकांना वाटतं. पण मी मुळची इंदौरची आहे. आता हळूहळू मराठी शिकते आहे. मी मराठी चित्रपट बघते. विषय, संहिता यामुळे मला ते आवडतात. मराठीसह बंगाली आणि मल्याळम चित्रपटही मी आवडीने बघते.
शुभांगी अत्रे 'भाभीजी घर पर है' मालिकेतून घराघरात पोहचली आहे. याआधी तिने 'कसोटी जिंदगी की','कस्तुरी','चिडिया घर' या मालिकांमध्येही झळकली आहे.