हुसैन पत्नीसोबत व्हेकेशन करतोय एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 15:27 IST2017-07-21T09:57:02+5:302017-07-21T15:27:02+5:30
हुसैन कुवार्जेवाला 'कुमकुम' मालिकेत सुमित ही भूमिका आजही रसिकांच्या लक्षात आहे.सुमित म्हणून आजही हुसैनला त्याचे चाहते त्याला ओळखतात.तब्बल 7 ...

हुसैन पत्नीसोबत व्हेकेशन करतोय एन्जॉय
ह सैन कुवार्जेवाला 'कुमकुम' मालिकेत सुमित ही भूमिका आजही रसिकांच्या लक्षात आहे.सुमित म्हणून आजही हुसैनला त्याचे चाहते त्याला ओळखतात.तब्बल 7 वर्ष 'कुमकुम' या मालिकेने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले.'कुमकुम' मालिकेतील भूमिकेनं हुसैननं रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. सलग सात वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर मालिकेने छोट्या पडद्यावरुन एक्झिट घेतली.'कुमकुम' भूमिका साकारणारी जुही परमार आणि हुसैनने रंगवलेला सुमित या दोघांची जोडीवर रसिकांच्या अधिक पसंतीस उतरली होती. कुमकुम मालिका संपल्यानंतर हुसैन अनेक वेगवगेळ्या कार्यक्रमात झळकला. आता हुसैन 'साजन रे फिर झूठ मत बोलो' या विनोदी मालिकेत झळकतोय.आता काही दिवस त्याने शूटिंगमधून ब्रेक घेत पत्नी टीनासोबत थोडा निवांत वेळ घालवण्यासाठी थेट गोवा गाठलं आहे. गोवा म्हटलं की बीच, म्युझिक, पर्यटक, ... एकूणच फुल ऑन धम्माल करताना हुसैन पाहायला मिळतोय. कुणालाही भुरळ पडावी असं निसर्ग सौंदर्य, साद घालणारा समुद्र आणि नयनरम्य किनारे.. निळाशार पाण्यात आणि रुपेरी वाळूच्या माडांच्या वनात धम्माल करण्याची मजाच काही और.. त्यासाठी गोव्याशिवाय दुसरा उत्तम पर्य़ाय कोणता असू शकतो..गोव्याचे सुंदर लोकेशन्सचा आनंद घेतानाचे काही फोटो हुसैनने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोत हुसैनची पत्नी टीनाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय.राखी विजन आणि हुसैन कुवार्जेवाला सध्या सजन रे फिर झूठ मत बोलो या कार्यक्रमात एकत्र काम करत आहेत.'सजन रे फिर झूठ मत बोलो' ही मालिका काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.