'प्रेम आणि फक्त तुझ्यासाठी प्रेम..', साखरपुड्यानंतर ह्रता दुर्गुळेने प्रतीक शाहसाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 11:15 IST2021-12-28T11:07:27+5:302021-12-28T11:15:35+5:30
साखरपुड्यानंतर आता ह्रता (Hruta Durgule)ने प्रतीक (Prateek Shah)साठी एक सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.

'प्रेम आणि फक्त तुझ्यासाठी प्रेम..', साखरपुड्यानंतर ह्रता दुर्गुळेने प्रतीक शाहसाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिचा प्रतीक शाह (Prateek Shah) सोबत 24 डिसेंबरला साखरपुडा पार पडला आहे.साखरपुड्यानंतर आता ह्रताने प्रतिकसाठी एक सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. पोस्ट लिहिताना ह्रताने प्रतिकसोबतचा एक रोमाँटिक फोटोदेखील शेअर केला आहे.
प्रतीकचा शाहच्या 27 डिसेंबरला वाढदिवस (Prateek Shah Birthday) झाला यानिमित्ताने ह्रताने ही खास पोस्ट लिहिली होती. ह्रताने या पोस्टमध्ये लिहिले,वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मिस्टर शाह..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..happiness , luck and positivity. तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य नेहमी असेच राहुदे. तू जिथं जाशील तिथं तुझ्या चेहऱ्यावरचे तेज असेच राहुदे... प्रेम आणि फक्त तुझ्यासाठी प्रेम ..असं म्हणत तिनं प्रतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांकडूनही प्रतिकवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
ह्रताने साखरपुड्या आधीच काही दिवस प्रतीकसोबतचा फोटो शेअर करत नात्याची कबुली दिली होती. हृताच्या प्रियकराचे नाव प्रतीक शाह असून तो लोकप्रिय टीव्ही दिग्दर्शक आहे. प्रतिकने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. बेहद २', 'बहू बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'तेरी मेरी एक जिंदड़ी' या मालिकांसाठी त्याने काम केले आहे.
हृता दुर्गुळे हिने छोट्या पडद्यावर दुर्वा या मालिकेतून पदार्पण केले. त्यानंतर तिला खरी लोकप्रियता मिळाली ती फुलपाखरू या मालिकेतून. ऋताचे दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक लोकप्रिय झाले आहे. सध्या ती मन ऊडू ऊडू झाले या मालिकेत काम करते आहे. तर प्रतिक शाह हा टेलिव्हिजनवरील आघाडीचा दिग्दर्शक आहे. त्याने आतापर्यंत बेहद २, कुठ रंग प्या के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदडी, बहू बेगम या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. प्रतिकची आई मुग्धा शाह यादेखील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.