हृता दुर्गुळे लवकरच करणार मोठी घोषणा, पोस्ट शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 13:39 IST2023-02-22T13:39:05+5:302023-02-22T13:39:47+5:30
Hruta Durgule : हृताची ही घोषणा नेमकी कशाबद्दल आहे, याबद्दल विविध तर्कवितर्क लावले जात आहे. हृताचे अनेक चाहते याबद्दल अंदाज वर्तवतानाही दिसत आहेत.

हृता दुर्गुळे लवकरच करणार मोठी घोषणा, पोस्ट शेअर करत म्हणाली...
टेलिव्हिजन ते चित्रपट असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (Hruta Durgule). अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे. दुर्वा, फुलपाखरु आणि मन उडू उडू झालं मालिकेतून हृताला खूप लोकप्रियता मिळाली. ‘अनन्या’, ‘टाईमपास ३’ या दोन्ही चित्रपटांमुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली. त्यानंतर आता लवकरच हृता एक मोठी घोषणा करणार आहे. याबद्दल खुद्द तिनेच सोशल मीडियावर सांगितले आहे.
हृता दुर्गुळे सोशल मीडियावर सक्रीय असून ती नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देताना दिसते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती आनंदी दिसत आहे. या फोटोसोबत तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिले की, आजचा दिवस फारच खास आहे. याबरोबर तिने #announcementsoon #happy #grateful #blessed #hrutadurgule, असे हॅशटॅगही दिले आहे.
हृताने दिलेल्या हॅशटॅगनंतर ती काहीतरी मोठी घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. हृताची ही घोषणा नेमकी कशाबद्दल आहे, याबद्दल विविध तर्कवितर्क लावले जात आहे. हृताचे अनेक चाहते याबद्दल अंदाज वर्तवतानाही दिसत आहेत.
हृता दुर्गुळेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. हृताने दुर्वा या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ती फुलपाखरु या मालिकेत झळकली. या मालिकेमुळेच तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. हृताने अनन्या आणि टाइमपास ३ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.