होणाऱ्या पतीसाठी ह्रता दुर्गुळेने व्हॅलेंटाइन डे निमित्त लिहिली रोमाँटिक पोस्ट, म्हणाली-प्रेम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 18:29 IST2022-02-14T18:25:27+5:302022-02-14T18:29:28+5:30

अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने आपला होणारा पती प्रतिक शहासोबतचा फोटो शेअर करत, एक रोमाँटिक पोस्ट लिहिली  आहे.

Hrta Durgule wrote a romantic post on the occasion of Valentine's Day for her future husband | होणाऱ्या पतीसाठी ह्रता दुर्गुळेने व्हॅलेंटाइन डे निमित्त लिहिली रोमाँटिक पोस्ट, म्हणाली-प्रेम...

होणाऱ्या पतीसाठी ह्रता दुर्गुळेने व्हॅलेंटाइन डे निमित्त लिहिली रोमाँटिक पोस्ट, म्हणाली-प्रेम...

कलाकार म्हटलं की त्याचे चाहते आलेच. चाहत्यांना त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडते. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. दरम्यान आज व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर सेलिब्रेटींनी स्पेशल पोस्ट शेअर केल्या आहेत. अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने आपला होणारा पती प्रतिक शहासोबतचा फोटो शेअर करत, एक रोमाँटिक पोस्ट लिहिली  आहे.

"प्रेम विजेसारखे येते आणि त्याच प्रकारे अदृश्य होते. जर तुम्ही भाग्यवान असाल, तर ते तुमच्यासोबत रहाते. जर नाही, तर तुम्ही तुमचं आयुष्य अशा माणसाच्या प्रतिक्षेत जाईल तो तुमच्याकडे नाही.” - चित्रा बॅनर्जी दिवाकरुनी! मी खूप भाग्यवान आहे. तुझ्याबद्दल सदैव कृतज्ञ असेन. 

हृता दुर्गुळे हिने छोट्या पडद्यावर दुर्वा या मालिकेतून पदार्पण केले. त्यानंतर तिला खरी लोकप्रियता मिळाली ती फुलपाखरू या मालिकेतून. ऋताचे दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक लोकप्रिय झाले आहे. सध्या ती मन ऊडू ऊडू झाले या मालिकेत काम करते आहे. तर प्रतिक शाह हा टेलिव्हिजनवरील आघाडीचा दिग्दर्शक आहे. त्याने आतापर्यंत बेहद २, कुठ रंग प्या के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदडी, बहू बेगम या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. प्रतिकची आई मुग्धा शाह यादेखील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.

हृताचा होणार नवरा प्रतीक शाह असून तो लोकप्रिय टीव्ही दिग्दर्शक आहे. प्रतिकने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. बेहद २', 'बहू बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'तेरी मेरी एक जिंदड़ी' या मालिकांसाठी त्याने काम केले आहे.

Web Title: Hrta Durgule wrote a romantic post on the occasion of Valentine's Day for her future husband