रिकी पटेल कसा साधतो अभ्यास आणि अभिनयचा समतोल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 14:37 IST2017-09-18T09:03:02+5:302017-09-18T14:37:06+5:30

‘स्टार भारत’ या वाहिनीवरील ‘आयुष्यमान भव’ या मालिकेत क्रिश ही प्रमुख भूमिका साकारणारा बालकलाकार रिकी पटेल याला वेळेचे व्यवस्थापन ...

How does Ricky Patel relate to studying and balancing? | रिकी पटेल कसा साधतो अभ्यास आणि अभिनयचा समतोल ?

रिकी पटेल कसा साधतो अभ्यास आणि अभिनयचा समतोल ?

्टार भारत’ या वाहिनीवरील ‘आयुष्यमान भव’ या मालिकेत क्रिश ही प्रमुख भूमिका साकारणारा बालकलाकार रिकी पटेल याला वेळेचे व्यवस्थापन जमले आहे, असे दिसते. 
क्रिशची भूमिका साकारणारा बालकलाकार रिकी पटेल याने अभ्यास आणि अभिनय यांचा मेळ गातलेला आहे. केवळ आठ वर्षांचा असलेल्या रिकीने अभ्यास आणि अभिनय यांना न्याय दिला आहे. मालिकेतील आपला प्रत्येक प्रसंग अचूक चित्रीत झाला पाहिजे, यासाठी रिकी भरपूर मेहनत घेतो; त्याचवेळी चित्रीकरणामुळे आपल्या अभ्यासावर परिणाम होणार नाही, याचीही तो काळजी घेताना दिसतो. तो रोज सकाळी शाळेत जातो आणि संध्याकाळी मालिकेसाठी चित्रीकरण करतो. तसेच प्रत्येक प्रसंगाचे चित्रीकरण पार पडल्यावर तो त्या दिवशी शाळेत जे शिकविलेले असते, त्याची उजळणी करतो.

त्याच्या या वेळापत्रकाबद्दल आम्ही रिकीला विचारले असता रिकी म्हणाला, “हो, मी सकाळी शाळेत जातो आणि संध्याकाळी सेटवर येतो. ही मालिका आणि माझा अभ्यास या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी सारख्याच महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही गोष्टींचा समतोल साधण्याचा मी प्रयत्न करीत आहे. या मालिकेचे सर्व कर्मचारी फारच सहकार्य करणारे असून मला या दोन्ही गोष्टी साध्य करता येतात, याबद्दल मी सुदैवी आहे.”  

या आधी रिकीने दिया और बाती हम या मालिकेत तर जोधा अकबर या चित्रपटात काम केले आहे. यानंतर तो इंतेकाम एक मासूम या मालिकेत झळकला होता. रिकी हा सलमानचा चाहता आहे. सलमानच्या ट्युबलाईट चित्रपटा सलमानसोबत काम करण्याची संधी रिकीला मिळाली होती. रिकी एका अॅवॉर्ड शोमध्ये अँकरिंग करतानासुद्धा दिसणार आहे. 

Web Title: How does Ricky Patel relate to studying and balancing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.