'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतला राणा दाचा हा स्टायलिश लूक कसा वाटला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 09:25 IST2017-09-16T03:55:42+5:302017-09-16T09:25:42+5:30

छोट्या पडद्यावरील 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका रसिकांमध्ये दिवसेंदिवस हिट ठरत आहे. मालिकेतील राणा दा आणि पाठकबाईची केमिस्ट्री रसिकांमध्ये ...

How did Rana Dacha get a stylish look in the series of 'Jeev Rangla?' | 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतला राणा दाचा हा स्टायलिश लूक कसा वाटला?

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतला राणा दाचा हा स्टायलिश लूक कसा वाटला?

ट्या पडद्यावरील 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका रसिकांमध्ये दिवसेंदिवस हिट ठरत आहे. मालिकेतील राणा दा आणि पाठकबाईची केमिस्ट्री रसिकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत दिवसागणिक नवनवीन ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळत आहेत. लवकरच पाठकबाई जर्मनीला जाणार आहे. एकीकडे पाठकबाईंनी राणाला आखाड्यात जाण्यास सांगितलं आहे. दुसरीकडे राणा दा मात्र पाठकबाईंना इंग्रजी शिकून आश्चर्याचा धक्का देण्याच्या विचारात आहे. हे तर झालं ऑनस्क्रीन राणा दाची गोष्ट. मात्र राणा दा अर्थात हार्दिक जोशीचा डॅशिंग आणि धडाकेबाज लूक पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. सूट बूट में आया कन्हैय्या बँड बजाने को हे हिंदी सिनेमातील एका प्रसिद्ध गाण्याच्या ओळींप्रमाणे राणा दा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीचा हा लूक तुमच्यासाठीही एक आश्चर्याचा सुखद धक्का ठरेल. आकर्षक ब्लेझर, टाय, कानात बाली, तितकीच साजेशी हेअर स्टाईल आणि चेह-यावर स्मित हास्य यामुळे राणा दाचा हा फोटो खास ख-या अर्थाने वेगळा ठरला आहे. राणा दाचा हा रिअल डॅशिंग आणि धडाकेबाज फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. सरळ साधा आणि भोळा भाबडा राणा दा मालिकेत रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. तरुणींमध्ये तर राणा दा म्हणजेच हार्दिक जोशीची जास्त क्रेझ पाहायला मिळते. कुस्तीच्या आखाड्यातला रांगडा गडी, पैलवान राणा दानं मोठ्या खुबीने रंगवला आहे. त्यामुळे हार्दिक जोशी रसिकांचा लाडका बनला आहे. आता सूट बूटमधील हा हार्दिक जोशीचा हा अवतारही तरुणींनाही नक्कीच भावेल यांत शंका नाही. आता पाठकबाई जर्मनीला जाण्याच्या तयारीत असताना त्यांना निरोप देताना फाडफाड इंग्रजीसह अशाच काहीशा अंदाजात राणादा अवतरल्यास आश्चर्य वाटायला नको. तसं झालंच तर सूट बूट में आया कोल्हापूरचा गडी अशा ओळी रसिकांच्या ओठावर आपुसकच तरळतील हे मात्र नक्की. या मालिकेतील अंजली पाठकबाई अर्थात अक्षया देवधर आणि पैलवान राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी यांची केमिस्ट्री चांगलीच सुपरहिट ठरते आहे. चालतंय की म्हणत मनं जिंकणा-या राणा दा सोबत मालिकेतील शांत, संयमी आणि सोज्वळ अशा पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधरसुद्धा लोकप्रिय ठरली आहे. 

Also Read:पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधरच्या फोटोला राणा दा का बोलतोय चालतंय की?

Web Title: How did Rana Dacha get a stylish look in the series of 'Jeev Rangla?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.