हिना खान वारिस या मालिकेद्वारे करणार कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2017 12:49 IST2017-03-09T07:12:21+5:302017-03-09T12:49:46+5:30
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे हिना खान प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. गेली आठ वर्षं ती या मालिकेचा भाग ...
(1).jpg)
हिना खान वारिस या मालिकेद्वारे करणार कमबॅक
य रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे हिना खान प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. गेली आठ वर्षं ती या मालिकेचा भाग आहे. पण गेल्या काही महिन्यांपूर्वी तिने या मालिकेला रामराम ठोकला. या मालिकेनंतर ती आता कोणत्या मालिकेत पाहायला मिळणार अशी सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. दरम्यानच्या काळात ती बिग बॉसमध्ये रोहन मेहरासोबत दिसली होती. पण ती तिथे केवळ त्याची मार्गदर्शक म्हणून गेली होती.
हिना खान हे छोट्या पडद्यावरचे एक प्रसिद्ध नाव असल्याने तिने आपल्या मालिकेत, चित्रपटात काम करावे अशी अनेक निर्मात्यांची इच्छा आहे आणि तिला अनेक चित्रपटांच्या आणि मालिकांच्या ऑफर्स येत असून सध्या ती अनेक पटकथा वाचत आहे. चांगली पटकथा असल्याशिवाय कमबॅक करायचा नाही असे तिने ठरवले आहे. पण प्रेक्षकांना त्यांची लाडकी अक्षरा म्हणजेच हिना आता एका मालिकेत एका भागासाठी पाहायला मिळणार आहे. एका मालिकेच्या होळी सेलिब्रेशनमध्ये ती सहभागी होणार आहे. वारिस आणि बढो बहू या दोन्ही मालिका एकत्र मिळून होळीचे सेलिब्रेशन करणार आहेत आणि यात हिना खान झळकणार आहे. यात हिना कोणती व्यक्तिरेखा साकारणार नसून हिना खान म्हणूनच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेतील तिचा लूक खूप वेगळा असणार आहे. ती ग्लॅमरस अवतारात या मालिकेत दिसणार असून ती काही गाण्यांवर नृत्यदेखील सादर करणार आहे. सोनाक्षी सिन्हाच्या ऑल इज वेल या चित्रपटातील नच फर्राटे आणि प्रियांका चोप्राच्या दिल धडकने दो या चित्रपटातील गलन गुडिया या गाण्यांवर ती थिरकणार आहे. नृत्यात तिला वारिस आणि बढो बहू या मालिकेतील कलाकार साथ देणार आहेत.