​दृष्टी धामी पतीसोबत गोव्यात करतेय हॉलिडे एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 13:45 IST2017-03-02T08:15:41+5:302017-03-02T13:45:41+5:30

दृष्टी धामी परदेस में है मेरा दिल या मालिकेत नैना ही भूमिका साकारत आहे. या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच ...

Holiday Angel in Goa with Vishesh Dhami | ​दृष्टी धामी पतीसोबत गोव्यात करतेय हॉलिडे एन्जॉय

​दृष्टी धामी पतीसोबत गोव्यात करतेय हॉलिडे एन्जॉय

ष्टी धामी परदेस में है मेरा दिल या मालिकेत नैना ही भूमिका साकारत आहे. या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेचे चित्रीकरण ती गेल्या काही महिन्यांपासून करत आहे. ही डेली सोप मालिका असल्याने मालिकेच्या चित्रीकरणातच तिचे दिवसातील 10-12 तास जातात. तसेच महिन्यातील जास्तीत जास्त दिवस तिला चित्रीकरणासाठी द्यावे लागतात. त्यामुळे तिला तिच्या पतीला वेळच द्यायला मिळत नाही. त्यामुळे आता तिने खास तिच्या नवऱ्यासाठी वेळ काढला आहे. 
दृष्टी धामीने नीरज खेमकासोबत 2015मध्ये लग्न केले. नीरज हा एक व्यवसायिक असून नीरज आणि दृष्टीच्या लग्नाला नुकतेच दोन वर्षं पूर्ण झाले. त्या दोघांनी त्यांचा हा दिवस खूप चांगल्याप्रकारे साजरा करण्याचे ठरवले होते. यासाठी कित्येक दिवसांपासूनच त्यांचे प्लानिंग सुरू होते. या खास दिवसासाठी ते दोघे गोव्याला गेले होते. त्यांनी या ट्रीपचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि त्यासोबत तिने एक कॅप्शनदेखील लिहिले आहे. तिने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, आम्ही दोघे गोव्याला खूप मजा मस्ती करत आहोत. मी गेल्या अनेक दिवसांपासून खूप दिवसांच्या सुट्टीवर जाण्याचे ठरवत आहे. पण मी परदेस में है मेरा दिल या मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने मला कुठेही जायला जमत नव्हते. पण आता चित्रीकरणातून वेळ काढून मी काही दिवस   नीरजसोबत घालवायचे ठरवले आहेत. मला मिळालेल्या या वेळात मी त्याच्यासोबत प्रत्येक क्षण जगत आहे. हे दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.
दृष्टीने सोशल मीडियाला शेअर केलेल्या फोटोंना तिचे फॅन्स भरभरून लाइक्स देत आहेत. 


Web Title: Holiday Angel in Goa with Vishesh Dhami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.