सिद्धी आणि विवेकने जागवल्या होळीच्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2016 20:17 IST2016-03-25T03:17:03+5:302016-03-24T20:17:03+5:30

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘देवयानी’ मालिकेत होळीच्या निमित्ताने अनोख्या नाट्यमय घडामोडी दाखविण्यात आल्या. एक्काने आपल्याकडे यावे यासाठी विणा देवयानीला आपल्या ...

Holi remembered Holi celebrated by Siddhi and Vivek | सिद्धी आणि विवेकने जागवल्या होळीच्या आठवणी

सिद्धी आणि विवेकने जागवल्या होळीच्या आठवणी

टार प्रवाह वाहिनीवरील ‘देवयानी’ मालिकेत होळीच्या निमित्ताने अनोख्या नाट्यमय घडामोडी दाखविण्यात आल्या. एक्काने आपल्याकडे यावे यासाठी विणा देवयानीला आपल्या रस्त्यातून हटवण्यासाठी तिच्यावर हल्ला करते. तिला जखमी करून एका बॉक्समध्ये बंद करून ठेवते. हाच बॉक्स होळीत पेटवून देण्याचा तिचा डाव मात्र उधळला जातो. कारण वेळीच एक्काला देवयानीचा शोध लागतो आणि तो तिला वाचवतो.
असा हा नाट्यमय प्रसंग करतानाच ‘देवयानी’ मालिकेत एक आगळी वेगळी होळी पेटविण्यात आली. होळी पेटविण्यासाठी झाडे न तोडता, सेटवर उपलब्ध असलेल्या जुन्या वस्तू तसेच कलाकारांनीही आपापल्या घरातील जुनाट लाकडी वस्तूंचा वापर केला. याचनिमित्ताने देवयानी म्हणजेच सिद्धी कारखानीस आणि सर्वांचा लाडका एक्का म्हणजेच विवेक सांगळे या दोघांनी ‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना बालपणीच्या रंगपंचमीच्या आठवणींना उजाळा दिला.

सिद्धी म्हणाली, ‘माझं बालपण विरार येथे गेले. लहानपणी आम्ही सगळे मुलं-मुली गुलालाने रंगपंचमी खेळायचो. घराच्या खिडकीत बसून येणाºया-जाणाºयांवर पिचकारीने पाणी उडवायचो. खुप मजा यायची तेव्हा. पण जसजसे मोठे होत गेलो, तसे पाण्याचे नुकसान करत असल्याची भावना मनात येऊ लागली. त्यामुळे आम्ही पाण्याचा वापर रंगपंचमीसाठी खेळताना बंद केला. आता तर महाराष्टÑात असलेला दुष्काळ लक्षात घेता मी रंगांची उधळण करण्यासही सहमत नाही. कारण केवळ ‘ड्राय होळी’च्या नावाने रंगांनी खेळायचे, मात्र पुन्हा तो रंग काढतानाही तितकेच पाणी वाया जाते. म्हणूनच यंदा मी रंगपंचमी न खेळण्याचाच निर्णय घेतला. मी याची सुरुवात स्वत:पासूनच केली आहे. आधी स्वत:ला बदलले फार गरजेचे असते, नंतरच आपण दुसºयांना सल्ला देऊ शकतो, असे माझे मत आहे.’

विवेक आपल्या लालबाग, परळ भागातील आठवणी सांगताना म्हणाला, ‘मुंबईतील सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाºया लालबाग भागात मी राहतो. रंगपंचमीच्या दिवशी संपूर्ण दिवस आम्ही खूप धम्माल करतो. नैसर्गिक रंग आणि गुलालाने खेळतो. आम्ही केवळ बॉइज गॅँग दुपारनंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन रंग आणायचे आहेत सांगून पैसे घ्यायचो आणि पार्टी करायचो. सणाच्या निमित्ताने आम्हाला कोणी ओरडायचेही नाही. अशी वेगळीच धम्माल करायला मिळायची.’

Web Title: Holi remembered Holi celebrated by Siddhi and Vivek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.