'रामायण' आणि 'कृष्णा'मालिकेतून घराघरात पोहोचली, सौंदर्याची आजही होते चर्चा; सध्या कुठे आहे ही अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 17:02 IST2024-03-13T16:59:41+5:302024-03-13T17:02:40+5:30

'रामायण' मालिकेत प्रभू श्री रामांचे भाऊ भरत यांच्या पत्नीची भूमिका साकारून अभिनेत्री लोकप्रिय झाली. 'मांडवी' हे पात्र निभावून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 

hindi television ramayana serial fame sulakshana khatri bharat wife now her look change  | 'रामायण' आणि 'कृष्णा'मालिकेतून घराघरात पोहोचली, सौंदर्याची आजही होते चर्चा; सध्या कुठे आहे ही अभिनेत्री?

'रामायण' आणि 'कृष्णा'मालिकेतून घराघरात पोहोचली, सौंदर्याची आजही होते चर्चा; सध्या कुठे आहे ही अभिनेत्री?

Ramayan: छोट्या पडद्यावर मालिकाविश्वात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'रामायण'. या मालिकेने चाहत्यांची मनं जिंकून टेलिव्हिजन विश्वाचा कायापालटच केला. पण रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेत 'मांडवी'च्या भूमिकेत झळकणारी अभिनेत्री तुम्हाला आठवतेय का, सध्या त्या करतायत जाणून घेऊया...

९० च्या दशकातील रामानंद सागर दिग्दर्शित 'रामायण' ही पौराणिक मालिका प्रंचंड लोकप्रिय ठरली. आजही या मालिकेची क्रेझ तितकीच कायम आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या मालिकेतील पात्रांना त्यांच्या नावाने नाही तर भूमिकेमुळे लोक आजही ओळखतात. या मालिकेतील प्रभू श्री रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल किंवा सीता मातेच्या भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया या कलाकारांनी आपल्या कामाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. त्याचबरोबर 'मांडवी'च्या भूमिकेत झळकणारी अभिनेत्री सुलक्षणा खत्री यांनी देखील आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं. त्यांच्या सौंदर्याची आजही लोक चर्चा करतात. 

भले रामायण मालिकेत सुलक्षणा खत्री यांनी छोटा रोल केला असेल तरीही त्यांनी केलेली भूमिका चाहत्यांच्या कायम लक्षात राहणारी आहे. सुलक्षणा गेल्या ३६ वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. त्यानंतर सुलक्षणा  'तेरे मेरे सपने’, ‘बेस्ट ऑफ लक निक्की', 'संजीवनी', 'अलिफ लैला', 'महाराज की जय हो', 'जाना ना दिल से दूर', 'कुल्फी कुमार बाजेवाला', 'सपना बाबुल का बिदाई' आणि 'लव' कुशसारख्या मालिकांमध्ये झळकल्या. सध्या अभिनेत्री अभिनयापासून दूर आहे. त्यांनी मनोरंजन सृष्टीपासून लांब राहणं पसंत केलंय. 

Web Title: hindi television ramayana serial fame sulakshana khatri bharat wife now her look change