तीनदा गर्भपात, लोकांचे ऐकले टोमणे! लग्नाच्या १२ वर्षांनी अभिनेत्री झाली आई; 'ते' अनुभव सांगताना म्हणाली..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:37 IST2025-11-20T17:35:06+5:302025-11-20T17:37:32+5:30
कलाकार म्हटलं की अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोललं जातं.त्यांचं रिलेशनशिप , लग्न आणि मुलांबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते.

तीनदा गर्भपात, लोकांचे ऐकले टोमणे! लग्नाच्या १२ वर्षांनी अभिनेत्री झाली आई; 'ते' अनुभव सांगताना म्हणाली..
Television Actress: छोट्या पडद्यावरील 'बालिका वधू' ही लोकप्रिय मालिका होती. या मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या मालिकेतून अभिनेत्री नेहा मर्दा हे नाव घराघरात पोहोचलं. बालिका वधू मध्ये तिने साकारलेली गहाना नावाची भूमिका आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. नेहा बऱ्याच वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय नव्हती. पण आता तिने अभिनयविश्वात परतायचं ठरवलं आहे. अशातच तिने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्यासह अनेक गोष्टींबद्दल खुलेपणाने चर्चा केली.
अलिकडेच नेहाने 'जोश टॉक' प्लॅटफॉर्मवर हजेरी लावली. त्यावेळी अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नन्सीं काळावर भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये अनेत्रीने सांगितलं की, इंडस्ट्रीत सक्रिय असताना सर्वजण तिला म्हणायचे की आता तिने पुरेसे काम केले आहे, तिने तिच्या कुटुंबाचाही विचार केला पाहिजे. त्याबद्दल सांगताना नेहा म्हणाली, "मी जेव्हा जेव्हा कोणत्याही फॅमिला फंक्शनला जायचे किंवा कुठेही इतर ठिकाणी तेव्हा मला अनेकदा विचारलं जायचं तू किती दिवस एकटी येणार आहेस? मला वाटायचं की ते लोक आयुषबद्दल विचारत आहेत. पण, नंतर मला समजलं खरंतर ते वेगळ्याच गोष्टीबद्दल बोलायचे."
मग अभिनेत्रीने सांगितलं,"सगळे माझ्या मागे म्हणायचे, नेहाला आता सांगा वेळ निघत चालली आहे. काम चालूच राहील. आता, बाळ विचार करा.या १२ वर्षात, मी काय सहन केलं ते मी कोणालाही सांगितलं नाही. कारण मला कोणाच्याही सहानुभुतीची गरज नव्हती. मी कोणालाही सांगितलं नाही की माझा तीनदा गर्भपात झाला."असा कठीण प्रसंग अभिनेत्रीने मुलाखतीत शेअर केला.