टीव्हीवरील हॅण्डसम हंक! मानलेल्या बहिणीसोबत थाटला संसार, २ वर्षातच नातं तुटलं अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:03 IST2025-08-22T11:59:31+5:302025-08-22T12:03:49+5:30
मानलेल्या बहिणीसोबत थाटला संसार, २ वर्षातच नातं तुटलं अन् मग...; पत्नी होती प्रसिद्ध अभिनेत्री

टीव्हीवरील हॅण्डसम हंक! मानलेल्या बहिणीसोबत थाटला संसार, २ वर्षातच नातं तुटलं अन् मग...
Tv Actor Avinash Sachdev: बॉलिवूडमध्ये तर प्रेम, लग्न आणि घटस्फोट याचीही खुमासदार चर्चा रंगते. हिंदी चित्रपटसृष्टीतील एखाद्या कलाकाराचं लग्न मोडलं तर त्याची सर्वाधिक चर्चा रंगते.तो कलाकार जर रसिकांच्या गळ्यातला ताईत असेल तर या चर्चा आणखीच रंगतात.असे अनेक स्टार कपल आहेत ज्यांनी लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर घटस्फोट घेतला आहे.टीव्ही इंडस्ट्रीतील असाच एक लोकप्रिय अभिनेता अविनाश सचदेव. या अभिनेत्याची लव्ह लाईफ त्याच्या करिअरपेक्षा चर्चेत राहिली. छोटी बहु या मालिकेच्या माध्यमातून अविनाशला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली.या अभिनेत्याचं नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं होतं.
अविनाश सचदेवने अभिनेत्री शाल्मली देसाईसोबत २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र, लग्नाच्या २ वर्षांतच त्यांच्या नात्यात दुरावा आला त्यानंतर अविनाशने पत्नी शाल्मली घटस्पोट देण्याचा निर्णय घेतला आहे.पहिलं लग्न मोडल्यानंतर त्याने बऱ्याच टीव्ही अभिनेत्रींना डेट केलं आहे. अभिनेत्री रुबिना दिलैकच्या आणि त्याच्या अफेयर्सच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. अविनाश आणि रुबिना दिलैक यांनी छोटी बहू मालिकेत एकत्र काम केलं तं.त्याचदरम्यान त्यांचे सूत जुळले होते. मात्र, हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.
त्यानंतर 'इस प्यार को क्या नाम दॅूं 'लिकेदरम्यान,त्याची ओळख शाल्मली देसाईसोबत झाली. सुरुवातीला त्यांचं काही पटायचं नाही, नंतर हे दोघांमध्ये मैत्री झाली. या मालिकेत शाल्मलीने अविनाशच्या ऑनस्क्रिन वहिनीची भूमिका निभावली. त्यावेळी अविनाश तिला बहिण मानायचा.ती त्याची मानलेली बहिण होती. मात्र, कालांतराने त्यांच्यातील जवळीक वाढली आणि ते खऱ्या आयुष्यात एकमेंकांच्या प्रेमात पडले. 2017 मध्ये शाल्मलीने अविनाशवर मारहाणीचा आरोप लावला आणि दोघं त्या वर्षापासून वेगळे झाले. शाल्मली देसाई ही एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबत एक उत्तम लेखिका देखील आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया' ला दिलेल्या मुलाखतीत अविनाशने सांगितलं होतं की, तो सुरुवातीला शाल्मली देसाईला बहीण म्हणायचा.
अविनाशने यापूर्वी'बात हमारी पक्की है,'प्रित से बंधी ये दोरी राम मिलाये जोडी','इस प्यार को क्या नाम दुँ','कबूल है'यांसारख्या मालिकेत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.