"हे चाललंय काय! श्वासही घेता येईना...". हिना खानची पोस्ट; अभिनेत्रीची तब्येत बिघडली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:30 IST2026-01-06T14:30:01+5:302026-01-06T14:30:57+5:30
हिना खानला नक्की झालं काय?

"हे चाललंय काय! श्वासही घेता येईना...". हिना खानची पोस्ट; अभिनेत्रीची तब्येत बिघडली?
'ये रिश्ता क्या कहलाता है' मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान चर्चेत आहे. दोन वर्षांपूर्वी तिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. यानंतर तिला प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं. तिने अतिशय हिंमतीने कॅन्सरला तोंड दिलं आणि सोबतच ती कामही करत राहिली. नुकतीच ती 'पती पत्नी और पंगा'मध्ये दिसली. दरम्यान आता हिना पुन्हा तब्येतीच्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मुंबईतील प्रदूषणमुळे हिना खानला त्रासाला सामोरं जावं लागत आहे. तिला श्वसनाचाही त्रास होत आहे.
हिना खानने इन्स्टाग्रामवर मुंबईतील AQI चा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले, "हे काय चाललंय...श्वासही घेता येत नाहीये. यामुळे मी घराबाहेरची कामही कमी केली आहेत. सतत खोकला होतोय. सकाळच्या वेळी तर परिस्थिती आणखी वाईट आहे."
हिना खानला २०२४ साली कॅन्सरचं निदान झालं होतं. कॅन्सरवर उपचार घेण्याच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल ती म्हणालेली की, "हे खूप कठीण होतं. फारच जास्त अवघड गेलं. मी प्रत्येक तिसऱ्या आठवड्यात किमोथेरपीसाठी जात होते. पहिला आठवडा तर असह्य वेदनेत गेला. माझ्या नसानसांमध्ये वेदना होत होत्या. त्यानंतर दोन आठवडे जरा आराम मिळाला. या प्रक्रियेतही मी प्रवास केला आणि बरंच काही केलं."
हिना खानच्या तब्येतीसाठी चाहत्यांनी प्रार्थना केली आहे. याआधी अभिनेत्री संयमी खेर, रिचा चड्डा, दिया मिर्झा या अभिनेत्रींनीही मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त केली होती.