'आता तुम्ही मला शिकवणार?'; पापाराजींवर भडकली हिना खान, नेटकऱ्यांनी केलं जबरदस्त ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 08:51 AM2023-12-24T08:51:16+5:302023-12-24T08:51:52+5:30

Hina khan: आनंद पंडीत यांच्या बर्थ डे पार्टीत गेलेली हिना खान झाली ट्रोल

hina-khan-got-angry-with-paparazzi-at-anand-pandit-birthday-bash | 'आता तुम्ही मला शिकवणार?'; पापाराजींवर भडकली हिना खान, नेटकऱ्यांनी केलं जबरदस्त ट्रोल

'आता तुम्ही मला शिकवणार?'; पापाराजींवर भडकली हिना खान, नेटकऱ्यांनी केलं जबरदस्त ट्रोल

'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेत अक्षरा ही भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे  हिना खान (Hina Khan). बिग बॉसमुळे हिना विशेष चर्चेत आली. इतकंच नाही तर तिच्या फटकळ स्वभावामुळेही ती कायम चर्चेत येत असते. यामध्येच सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यात अनेकांनी 'इतका कसला गर्व झालाय', असं विचारत तिला खडेबोल सुनावले आहेत.

काही दिवसांपूर्वीची प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते आनंद पंडीत यांनी त्यांचा ६० वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी ग्रँड पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत बॉलिवूडसह अनेक टिव्ही सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. यात हिना खान सुद्धा सहभागी झाली होती. मात्र, या पार्टीत फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ देतांना तिने जो अॅटिट्यूड दाखवला त्यामुळे तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे.

या पार्टीत हिना सहभागी झाल्यानंतर पापाराजी तिचे फोटो क्लिक करु लागले. यात काही पापाराजींनी तिला कॅमेरात पाहून पोझ द्यायला सांगितलं. ज्यामुळे हिनाला राग आला. इतकंच नाही तर, अच्छा, आता तुम्ही मला सांगाल की कशी पोझ द्यायची आहे ते, असं म्हणत हिनाने त्यांना खोचक टोमणा मारला. हिनाने पापाराजींनी असं म्हटल्यानंतर टाळी सुद्धा वाजवली. तिची ही कृती लोकांना प्रचंड खटकली असून त्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

दरम्यान,'हिचा गर्वच एक दिवस तिला खाली आणणार आहे', असं एका युजरने म्हटलं आहे. तर, 'हिच्यात फारच अॅटिट्यूड आहे..नकारात्मक आहे हे सगळं', असं अन्य एका युजरने म्हटलं आहे. तर, 'पण हा एवढा अॅटिट्यूड नेमका कशासाठी', असाही प्रश्न एका युजरने विचारत तिला ट्रोल केलं आहे.

Web Title: hina-khan-got-angry-with-paparazzi-at-anand-pandit-birthday-bash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.