संस्कारी बहूचा बोल्ड अंदाज पाहून भडकले चाहते, सडकून होतेय तिच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 22:06 IST2021-03-20T22:04:53+5:302021-03-20T22:06:53+5:30
Hina Khan Bold Look: हीना खान आजही अक्षरा बहू म्हणूनच जास्त ओळखली जाते. तिची संस्कारी बहूची इमेज ब्रेक करण्याचा सध्या हीनाचा प्रयत्न असला तरीही काहीही केल्या तिला त्यात यश मिळत नाही.

संस्कारी बहूचा बोल्ड अंदाज पाहून भडकले चाहते, सडकून होतेय तिच्यावर टीका
'ये रिश्ता क्या कहलाता हैं’मालिकेतून अक्षरा म्हणजे हीना खान सा-यांची आवडती टीव्हीची बहू बनली होती. तिचा सोज्वळ अंदाज सा-यांच्या पसंतीस पात्र ठरला होता. मात्र साचेबद्ध कामात न अडकता नवीन काहीतरी करण्याचा तिचा प्रयत्न होता. त्यामुळे लोकप्रिय मालिका तिने सोडली आि ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ या सारख्या रिएलिटी शोमध्ये ती झळकली.
यांत तिचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. त्यानंतर हीनाचा अशाच प्रकारे ग्लॅमरस तितकाच बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही ती सुपर एक्टीव्ह असते. तिच्या विषयीच्या सगळ्याच गोष्टी ती चाहत्यांसह शेअर करते. तिच्या इन्स्टापेजवर नजर टाकल्यास तुम्हाला विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळती. ट्रेडिशनल असो किंवा वेस्टर्न तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांना आवडतो.
हीना खान आजही अक्षरा बहू म्हणूनच जास्त ओळखली जाते. तिची संस्कारी बहूची इमेज ब्रेक करण्याचा सध्या हीनाचा प्रयत्न असला तरीही काहीही केल्या तिला त्यात यश मिळत नाही. म्हणून तिचा बोल्ड लूक पाहून चाहत्यांचा होतो संताप. हीना सध्या मालदीव्हजमध्ये सुट्टयांचा आनंद घेत आहे. याच व्हॅकेशनदरम्यानचे तिचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फोटोत तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. बोल्ड लूक आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात हीनाचा हा फोटो आहे. हीनाच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. मात्र शेअर केलेल्या फोटोत तिने अधिकच बोल्ड पोज दिल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र याच फोटोशूटमुळे ती जबरदस्त ट्रोल होत आहे. हीनाचा हा अंदाज चाहत्यांना अजिबात आवडलेला नाहीय.
करिअरच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत हिनाच्या राहणीमानात बरेच बदल झाले आहेत. ती फिटनेस फ्रिकही बनली आहे. नेहमीच फिटनेसला महत्त्व देताना दिसते. टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री अशी ओळख असलेल्या हिना खानकडे स्वतःची Audi कार आहे. ती एका एपिसोडसाठी 1 ते 1.25 लाख रुपये एवढी फी घेते.टीव्ही अभिनेत्रींच्या यादीत सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून हीना खान गणली जाते.