हिना खानने बॉयफ्रेंड रॉकीसोबत गुपचूप उरकला साखरपुडा ? डायमंड रिंगसोबतचा शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 15:32 IST2021-02-16T15:27:44+5:302021-02-16T15:32:19+5:30
Hina khan flaunt her diamond ring : हिना खान आणि रॉकी जयस्वाल अनेक वर्षांपासून नात्यात आहेत.

हिना खानने बॉयफ्रेंड रॉकीसोबत गुपचूप उरकला साखरपुडा ? डायमंड रिंगसोबतचा शेअर केला फोटो
टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान आजकाल तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर हिना खान नेहमी स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. अलीकडेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत हिना आपल्या रिंग फिंगरमध्ये डायमंड रिंग फ्लॉन्ट करताना दिसतेय.
हिनाचे हे फोटो बघून तिचे फॅन्स अनेक प्रश्न विचारतायेत. अनेक यूजर्सने हिनाला या फोटोच्या कमेंट करताना तिने बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत गुपचूप साखरपुडा तर नाही केला. हिना खानच्या या फोटोंनंतर त्यांची एंगेजमेंट झाल्याची चर्चेने जोर पकडला आहे.
हिना खानने हा फोटो शेअर करत लिहिले की, ' व्हॅलेंटाईन डे साठी यापेक्षा सुंदर काहीही असू शकत नाही. हिना खानचे हे फोटो पाहून चाहत्यांनी प्रश्नांचा भडीमार केला आहे. हिना खान आणि रॉकी जयस्वाल अनेक वर्षांपासून नात्यात आहेत. हिना आणि रॉकीची ओळख ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या सेटवरच झाली होती. या मालिकेचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून तो काम करत होता. हिना ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून घराघरात पोहोचली आहे.२०१८ साली कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेत पहायला मिळाली होती. हिना खानने बॉलिवूडमध्ये हॅक्ड चित्रपटातून पदार्पण केले आहे. हिना खान काही महिन्यांपूर्वी ‘बिग बॉस 14’मध्ये दिसली होती.‘बिग बॉस 14’मध्ये दोन आठवडे राहण्यासाठी हिना खानला तगडी रक्कम मिळाली होती.