'धर्म वेगळा आहे हे 4 वर्षांपासून माहित नव्हते का', धर्माच्या नावावर ब्रेकअप केल्यामुळे हिमांशी ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 19:28 IST2023-12-08T19:24:47+5:302023-12-08T19:28:07+5:30

हिमांशीने सर्वांत आधी सोशल मीडियावर पोस्ट लिहून ब्रेकअपची माहिती दिली होती.

Himanshi Trolled For Breaking Up In The Name Of Religion | 'धर्म वेगळा आहे हे 4 वर्षांपासून माहित नव्हते का', धर्माच्या नावावर ब्रेकअप केल्यामुळे हिमांशी ट्रोल

'धर्म वेगळा आहे हे 4 वर्षांपासून माहित नव्हते का', धर्माच्या नावावर ब्रेकअप केल्यामुळे हिमांशी ट्रोल

प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल हिमांशी खुरानाने ‘बिग बॉस 13’ फेम अभिनेता असिम रियाझशी ब्रेकअप केल्याचा खुलासा केला. जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ही लोकप्रिय जोडी वेगळी झाली. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. धार्मिक श्रद्धेसाठी प्रेमाचा त्याग केल्याचं स्पष्टीकरण तिने दिलं आहे. धार्मिक विविधतेमुळे ब्रेकअप केल्याचं हिमांशीने सांगितल्यानंतर तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. 

एका यूजरने लिहिले की, 'जेव्हा तुम्ही 4 वर्षे सोबत होता. तेव्हा तुम्हाला धर्माची माहिती नव्हती का'. ट्रोलिंगनंतर स्वतःला योग्य सिद्ध करण्यासाठी हिमांशी खुरानाने असीमसोबतच्या वैयक्तिक चॅटही सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. मात्र यामुळे तिला आणखी ट्रोल करण्यात आले. यानंतर हिमांशीने तिचे ट्विवटर सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले आहे.

असिम रियाज हा प्रसिद्ध मॉडेल, अभिनेता, रॅपर आणि फिटनेस स्पेशलिस्ट आहे. तर दुसरीकडे हिमांशी ही पंजाबी अभिनेत्री आणि गायिका आहे. बिग बॉस 13 मध्ये दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. या शोमध्ये हिमांशीने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. ती बिग बॉसच्या घरात फार काळ टिकली नव्हती. पण त्या काळादरम्यान ती असिमच्या प्रेमात पडली. असीमने बिग बॉसच्या घरातच हिमांशीला प्रपोज केले होते. शो सोडल्यानंतर दोघेही एकत्र राहू लागले. मात्र, आता एकमेकांपासून वेगळे झाले आहेत.

Web Title: Himanshi Trolled For Breaking Up In The Name Of Religion