बेहद या मालिकेतील कुशल टंडन जेनिफर विंगेटसाठी खऱ्या आयुष्यातही बनला हिरो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 11:24 IST2017-02-08T05:07:21+5:302017-02-08T11:24:08+5:30
बेहद या मालिकेच्या सेटवर नुकतीच आग लागली. या आगीतून कुशल टंडनने जेनिफर विंगेटला वाचवले. कुशल आणि जेनिफरच्या लग्नाच्या दृश्याचे चित्रीकरण सुरू असताना अचानक लग्नाच्या मंडपाला आग लागली.

बेहद या मालिकेतील कुशल टंडन जेनिफर विंगेटसाठी खऱ्या आयुष्यातही बनला हिरो
ब हद या मालिकेत अर्जुनवर आपले अतोनात प्रेम आहे हे मायाने व्यक्त केल्यानंतर आता माया आणि अर्जुनचा विवाह होणार आहे. सध्या मालिकेत अर्जुन आणि मायाच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या लग्नाच्या दृश्याचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. पण या चित्रीकरणाच्यावेळी एक मोठा अपघात झाला आणि त्यात मायाची भूमिका साकारणारी जेनिफर विंगेट थोडक्यात वाचली.
माया आणि अर्जुनच्या लग्नाचा सिक्वल सुरू असताना अचानक मंडपात आग लागली. कोणाला कळायच्या आताच अग्निच्या ज्वाळा भडकू लागल्या. त्यावेळी कुशल टंडन आणि जेनिफर विंगेट दोघेही लग्नमंडपातच होते. कुशलने प्रसंगवधान दाखवत जेनिफरला वाचवले.
सेटवर घडलेल्या या घटनेविषयी कुशलनेच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगच्या साहाय्याने सगळ्यांना माहिती दिली आहे. कुशलने सेटवर आग लागल्यानंतरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे आणि त्यात म्हटले आहे की, मी आज एका मुलीला वाचवले आहे. असे अनेक प्रसंग मी चित्रपटात पाहिले होते. पण माझ्या खऱ्या आयुष्यात नुकताच असा प्रसंग घडला. मी त्यावेळी कशाप्रकारे पळालो होतो याचा आता विचार केला तर मला हसायला येत आहे. पण तो क्षण खरेच खूप भयानक होता. त्यावेळी माझ्या डोक्यात काय सुरू होते हे मलादेखील कळत नव्हते. जेनिफर इतक्या संकटात अडकली असताना एकही अॅक्शन डायरेक्टर तिला वाचवायला आला नाही याचे मला खूपच दुःख वाटले. जेनिफर खूपच घाबरली होती. पण देवाने मला पळत जाऊन तिला वाचवण्याची जी शक्ती दिली त्यासाठी मी देवाचे आभार मानतो.
लग्नाच्या दृश्यात मंडपाला आग लागल्याचे दाखवायचे होते. त्यासाठी मंडपाच्या काही भागांना आग लावण्यात आली होता. पण ती आग अधिक भडकली आणि संपूर्ण मंडपालाच आग लागली. दृश्य सुरू झाल्यानंतर सगळे जण आपापला अभिनय करण्यात व्यग्र होते. दृश्याच्या मागणीनुसार मंडपाला आग लावल्यानंतर भटजी मंडपाच्या बाहेर पळत गेला आणि जेनिफर आत बसली होती. कुशल जेनिफरच्या येथे आला. त्याने तिच्या गळ्यात हार घातला. तोपर्यंत सगळे काही व्यवस्थितपणे सुरू होते. पण काहीच क्षणात आगीची ठिणगी कुशलच्या कपड्यांवर पडली आणि तो आग विझवण्यासाठी मंडपाच्या बाहेर गेला. पण जेनिफर आतच आहे याची त्याला जाणीव झाल्यावर क्षणातच तो पुन्हा मंडपात गेला आणि तिला त्याने खेचून बाहेर काढले. जेनिफर तर खूपच घाबरली होती. त्यानंतर सेटवर असलेल्या यंत्रांच्या मदतीने टीममधील मंडळींनी काहीच सेकंदात आग विझवली.