हेमांगी कवीला लॉटरी लागली! अमिताभ बच्चन यांच्यासोबत करणार स्क्रीन शेअर, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 11:48 IST2023-10-11T11:46:50+5:302023-10-11T11:48:41+5:30

बिग बींबरोबर ऑन स्क्रीन दिसणार हेमांगी कवी, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

hemangi kavi to shared screen with amitabh bachchan in advertise shared video | हेमांगी कवीला लॉटरी लागली! अमिताभ बच्चन यांच्यासोबत करणार स्क्रीन शेअर, म्हणाली...

हेमांगी कवीला लॉटरी लागली! अमिताभ बच्चन यांच्यासोबत करणार स्क्रीन शेअर, म्हणाली...

हेमांगी कवी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत हेमांगीने काम केलं आहे. दमदार अभिनयाने हेमांगीने सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. हेमांगीने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे. आता हेमांगीला लॉटरी लागली आहे. हेमांगी बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. 

आज बिग बींचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवशी हेमांगीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन खास पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे. हेमांगीला एक जाहिरात मिळाली आहे. या जाहिरातीत तिला बिग बींबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. हेमांगीने या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यानचे काही खास क्षण हेमांगीने व्हिडिओतून शेअर केले आहेत. या पोस्टमधून तिने "क्या कहॅूं की खुशी, आश्चर्य, घबराहट, shock, respect से है लब सिले हुए! जिथे शब्द संपतात...वाढदिवसाच्या शुभेच्छा अमिताभ सर", असं म्हणत हेमांगीने बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत अभिनंदन केलं आहे. 

हेमांगीला बिग बींबरोबर पाहण्यासाठी चाहतेही आतुर आहेत. याआधी हेमांगीला क्रिकेटर युवराज सिंहबरोबर जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच तिने याबाबत पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली होती. 

Web Title: hemangi kavi to shared screen with amitabh bachchan in advertise shared video