हेमांगी कवीने जाहीरपणे मागितली माफी; नेमकं काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 12:05 IST2023-11-05T12:05:38+5:302023-11-05T12:05:38+5:30
Hemangi kavi: स्पष्टवक्तेपणामुळे ओळखल्या जाणाऱ्या हेमांगीने यावेळी चक्क माफी मागितली आहे.

हेमांगी कवीने जाहीरपणे मागितली माफी; नेमकं काय आहे प्रकरण?
आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी (hemangi kavi). समाज असो वा कलाविश्व कुठेही काही अनुचित प्रकार घडला की हेमांगी त्यावर बेधडकपणे तिचं मत मांडते. त्यामुळे बऱ्याचदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. परंतु, या ट्रोलर्सला ती सडेतोड उत्तर देते. मात्र, कायम इतकांना खडे बोल सुनावणाऱ्या हेमांगीने यावेळी चक्क सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांची माफी मागितली आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या हेमांगीने अलिकडेच इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने चाहत्यांची माफी मागितली आहे. विशेष म्हणजे तिची ही पोस्ट पाहिल्यावर हेमांगीने नेमकी माफी का मागितली हा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु, तिच्या माफी मागण्यामागेही खास कारण आहे.
बऱ्याचदा असं होतं की काही माणसं चॅट ओपन करतात आणि त्यावर रिप्लाय द्यायला विसरतात. हेमांगीच्या बाबतीतही असंच होतं. त्यामुळे तिने याबद्दल सगळ्यांची माफी मागितली आहे. 'मला माफ करा मी सुद्धा त्यापैकीच एक आहे', असं कॅप्शन देत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, हेमांगी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे आज मराठी कलाविश्वात तिचा दरारा असल्याचं पाहायला मिळतो.