'रंग माझा वेगळा'मधील आयशाचं Bold फोटोशूट पाहिलंत का?, व्हिडीओनं केलं सर्वांना क्लीन बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 15:25 IST2022-03-05T15:25:19+5:302022-03-05T15:25:45+5:30
रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) या मालिकेत आयशाची भूमिका साकारणारी अभिनेत्री विदीशा म्हसकर (Vidisha Mhaskar) सध्या चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

'रंग माझा वेगळा'मधील आयशाचं Bold फोटोशूट पाहिलंत का?, व्हिडीओनं केलं सर्वांना क्लीन बोल्ड
मराठी टेलिव्हिजनवरील टीआरपीच्या शर्यतीत गेल्या कित्येक दिवसांपासून रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत आयशाची भूमिका साकारणारी अभिनेत्री विदीशा म्हसकर (Vidisha Mhaskar) सध्या चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
अभिनेत्री विदीशा म्हसकर सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान नुकतेच विदीशाने बोल्ड फोटोशूट केले. त्यातील एक फोटो शेअर केला आहे आणि फोटोशूटदरम्यानचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती ब्रालेटमध्ये पाहायला मिळते आहे. या व्हिडीओत विदीशाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो आहे. तिच्या या व्हिडीओला खूप पसंती मिळत असून तिचे चाहते क्लीन बोल्ड झाले आहेत.
विदीशा म्हसकर टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या ती रंग माझा वेगळा मालिकेत आयशाची भूमिका साकारते आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. विदीशाने हे मन बावरे या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. याशिवाय तिने ती फुलराणी आणि बन मस्का या मालिकेतही काम केले आहे. तसेच तिने दहा बाय दहा या नाटकातही काम केले आहे.