Inside Pictures: या आलिशान घरात राहते मुनमुन दत्ता,पाहून तुम्हीही म्हणाल WOW !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 14:58 IST2021-12-17T14:58:12+5:302021-12-17T14:58:23+5:30

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतली बबिताजी उर्फ ​​मुनमुन दत्तासुद्धा (Munmun Dutta) तिच्या आलिशान घरामुळे चर्चेत आली आहे.. एक व्हिडीओच्या माध्यमातून तिने आपल्या घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

Have a look at Munmun Dutta's home, has decorated very well, Mom's room is very special for her | Inside Pictures: या आलिशान घरात राहते मुनमुन दत्ता,पाहून तुम्हीही म्हणाल WOW !

Inside Pictures: या आलिशान घरात राहते मुनमुन दत्ता,पाहून तुम्हीही म्हणाल WOW !

सेलिब्रिटींचं घर कसं असेल, त्यांच्या घरात काय आहे, त्यांनी घर कसं सजवलं आहे हे जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. त्यांच्या आयुष्यातील विशेषतः घराबाबत प्रत्येक गोष्ट ऐकायला मिळावी किंवा त्याची माहिती मिळावी अशी रसिकांची इच्छा असते. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतली बबिताजी उर्फ ​​मुनमुन दत्तासुद्धा तिच्या आलिशान घरामुळे चर्चेत आली आहे.

नमुन दत्ता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इंस्टाग्राम असो किंवा यूट्यूब, व्हिडिओ आणि तिचे फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. तसेतर मुनमुन दत्ता तिच्या खासगी आयुष्यातल्या गोष्टी शेअर करायला आवडत नाही. खूप विचार केल्यानंतर तिने पहिल्यांदाच आपल्या आलिशान घराची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.नुकतेच तिने तिचे नवीन घर खरेदी केले आहे. मोठ्या मेहनतीने तिने आपले घर सजवले आहे. एक व्हिडीओच्या माध्यमातून तिने आपल्या घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे. 


सुमारे पाच मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये मुनमुन सुरुवातीलाच म्हणते की, प्रत्येकाने आत येण्यापूर्वी शूज आणि चप्पल बाहेर काढली पाहिजेत. हा तिच्या घराचा पहिला नियम आहे.घरात तुम्हाला भींतींना तीन शेडमध्ये पेंट केल्याचे पाहायला मिळेल.घरात एंट्री करताच देवाचे दर्शन होते. घरात तिने छोटसं मंदिर बनवले आहे.   मंदिरात सोनेरी रंगाची गणेशमूर्ती आणि त्याच्या मागे दुर्गामातेची सोनेरी रंगाची मूर्ती दिसते.त्यानंतर थोडं पुढे गेल्यावर मुनमुनला मिळालेले सगळे अवॉर्ड्स पाहायला मिळतात. तसेच तिने काही प्राचीन वस्तूंची सजावट करुन भिंतीही सजवल्या आहेत.


जसजसे तुम्ही घरात पुढे जाल तसतसे तुम्हाला घराचा लिव्हींग एरिया दिसेल. सोफा सेट,भिंती देखील पांढर्‍या रंगात रंगवल्या आहेत.पडदे देखील पांढरे आहेत, जे संपूर्ण रुमला साधं पण तितकंच आकर्षक लूक देतात. याशिवाय विविध देशात सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या मुनमुनने तिथून  खरेदी केलेल्या सजावटीच्या वस्तूही तिच्या घरात पाहायला मिळतील.डायनिंगपासून ते बेडरुमपर्यंतच घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी तिने बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल. हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल.इतकंच काय तर या आलिशान घरावरुन तिचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल. 
 

Web Title: Have a look at Munmun Dutta's home, has decorated very well, Mom's room is very special for her