‘द व्हॉइस’ कार्यक्रमात परीक्षक म्हणून हर्षदीप कौरची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 17:26 IST2019-01-14T17:25:55+5:302019-01-14T17:26:22+5:30

स्टार प्लस वाहिनीवर लवकरच देशातील अत्यंत सुरेल आवाज कोणाचा, याचा शोध घेणारा ‘द व्हॉइस’ हा रिअ‍ॅलिटी कार्यक्रम दाखल होणार आहे.

Harshdeep Kaur selected as an examiner in 'The Voice' program | ‘द व्हॉइस’ कार्यक्रमात परीक्षक म्हणून हर्षदीप कौरची निवड

‘द व्हॉइस’ कार्यक्रमात परीक्षक म्हणून हर्षदीप कौरची निवड

स्टार प्लस वाहिनीवर लवकरच देशातील अत्यंत सुरेल आवाज कोणाचा, याचा शोध घेणारा ‘द व्हॉइस’ हा रिअ‍ॅलिटी कार्यक्रम दाखल होणार आहे. देशातील अत्यंत लोकप्रिय आणि गुणवान गायकांना या कार्यक्रमाशी निगडित करण्यात येत आहेत. या कार्यक्रमात परीक्षक म्हणून हर्षदीप कौर दिसणार आहे. 
या कार्यक्रमाशी निकटचा संबंध असलेल्या एका सूत्राने सांगितले, “‘द व्हॉइस’ या कार्यक्रमात एक परीक्षक म्हणून काम पाहण्यास कनिका कपूरसोबत हर्षदीप कौरनेदेखील अनुमती दिली आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांना व्यावसायिक संगीत क्षेत्रात एक यशस्वी गायक बनविण्याच्या दृष्टीने या स्पर्धकांना तयार करणार आहे. या कामास सुयोग्य असे कोणते उमेदवार आहेत,
यासाठी ती या स्पर्धकांची गाणी ऐकणार आहे. ”

तसेच आजवर आपल्या गाण्यांच्या लोकप्रियतेने लक्षावधी श्रोत्यांची मने जिंकलेली ही गायिका हर्षदीप कौर आता परीक्षकाच्या एका अगदी नव्या भूमिकेत पाहायला मिळणार असून ‘स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमात ती आणखी कशा प्रकारे योगदान देईल, त्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.


जगभरात अत्यंत लोकप्रिय असलेला उत्कृष्ट गायकांचा शो आणि चार एमी पुरस्कारांनी गौरविला गेलेला कार्यक्रम ‘द व्हॉइस’ने जगातील 180 देशांमध्ये विलक्षण लोकप्रियता संपादन केले आहे. यात देशातील अल्टिमेट व्हॉईसचा शोध घेण्यात येणार आहे. या शोमध्ये कनिका कपूरसह ए.आर. रेहमान यांच्यासारखे सिंगिग क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती परीक्षक म्हणून दिसणार आहेत. 

Web Title: Harshdeep Kaur selected as an examiner in 'The Voice' program