भेटा 'द यशोधरा सरनाईक' यांना! हर्षदा खानविलकरांची पुन्हा क्रेझ; 'मुलगी पसंत आहे' चा नवा प्रोमो पाहिलात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 14:50 IST2024-01-10T14:47:43+5:302024-01-10T14:50:27+5:30

'मुलगी पसंत आहे' या मालिकेचा  एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

Harshada Khanvilkar's New Serial Mulgi Pasant Ahe new promo | भेटा 'द यशोधरा सरनाईक' यांना! हर्षदा खानविलकरांची पुन्हा क्रेझ; 'मुलगी पसंत आहे' चा नवा प्रोमो पाहिलात?

भेटा 'द यशोधरा सरनाईक' यांना! हर्षदा खानविलकरांची पुन्हा क्रेझ; 'मुलगी पसंत आहे' चा नवा प्रोमो पाहिलात?

छोट्या पडद्यावर 'मुलगी पसंत आहे'  ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री हर्षदा खानविलकरांना नव्या भुमिकेत पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आपल्या दमदार अभिनयातून हर्षदा खानविलकर प्रेक्षकांची मने जिंकतात. आता  'मुलगी पसंत आहे' मालिकेत त्या यशोधरा नावाचे पात्र साकारत आहेत. 

नुकताच 'मुलगी पसंत आहे' या मालिकेचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमधील हर्षदा खानविलकरांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. 'भेटा द यशोधरा सरनाईक यांना...नवी मालिका 'मुलगी पसंत आहे!' १५ जानेवारीपासून सोम ते शनि संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे. प्रोमोमधील हर्षदा यांच्या अभिनयाच्या प्रेमात चाहते पडले आहेत. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

पुढचं पाऊल मधील अक्कासाहेब असो किंवा रंग माझा वेगळा मधील 'सौंदर्या इनामदार' त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांच्या पसंती उतरल्या. नकारात्मक छटा असलेली पण, सूनेवर माया करणारी ही पात्र विशेष गाजली होती. आता 'मुलगी पसंत आहे' मालिकेत त्या पुन्हा सासूच्या भुमिकेत आहेत. या नव्या मालिकेत सासू-सुनेची एक वेगळी लढाई या पाहायला मिळेल.  त्या साकारत असणारी सासू कशी असेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  
 

Web Title: Harshada Khanvilkar's New Serial Mulgi Pasant Ahe new promo