'नजर'मधील एका सीनसाठी हर्ष राजपूतला घ्यावे लागले ह्या गोष्टींचे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 16:32 IST2018-08-13T16:32:03+5:302018-08-13T16:32:44+5:30

'नजर' या मालिकेत राठोड कुटुंबियांच्या अनेक पिढ्यांना मोहना नावाच्या एका डायनची नजर लागली असून त्याचा त्यांच्या जीवनावर कसा विपरित परिणाम होत असतो, ते यात दाखवण्यात आले आहे. 

Harsh Rajput learned to lip sync for ‘Nazar’ | 'नजर'मधील एका सीनसाठी हर्ष राजपूतला घ्यावे लागले ह्या गोष्टींचे प्रशिक्षण

'नजर'मधील एका सीनसाठी हर्ष राजपूतला घ्यावे लागले ह्या गोष्टींचे प्रशिक्षण

ठळक मुद्देहर्ष राजपूत शिकला ‘लिप-सिंकिंग’


‘स्टार प्लस’वर नुकतीच सुरू झालेली मालिका 'नजर'ने आपली मन गुंतवून टाकणारी कथा, त्यातील थरार आणि ग्लॅमरस वेशभूषा यामुळे प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली आहे. अमानवी शक्तींच्या विषयावर आधारित असलेल्या या मालिकेची कथा मुंबईसारख्या महानगरीत घडते. अमानवी शक्ती आणि त्यांची माणसावर पडणारी वाईट दृष्टी हा या मालिकेच्या कथानकाचा विषय आहे. हर्ष राजपूत अंश राठोडची भूमिका करत असून त्याच्या ह्या वेगळ्‌या भूमिकेमुळे त्याला बरीच लोकप्रियता मिळत आहे. तो दावांश अर्धा मनुष्य आणि अर्धा डायन असून त्याला सुपरनॅचरल लूक देण्यासाठी निर्मात्यांनी कुठलीही कसर बाकी सोडलेली नाही.


'नजर' या मालिकेत अनेक विचित्र घटना घडत असल्या तरी राठोड कुटुंबीय एक पूजा करीत असतानाचा प्रसंग यात आहे. मालिकेच्या आगामी भागांमध्ये नायक अंश राठोडची भूमिका साकारणारा अभिनेता हर्ष राजपूत हा आरतीच्या गीतांसाठी ‘लिप-सिंकिंग’ करताना दिसेल. हर्ष म्हणाला, “मालिकेतील राठोड परिवाराचा मी ज्येष्ठ पुत्र असल्याने मला यात आरती गाणे गरजेचे होते. मी यापूर्वी गाण्यासाठी कधीच लिप-सिंकिंग केलेले नव्हते. नजर मालिकेसाठी मला लिप-सिंकिंग शिकावे लागले. आरतीच्या प्रसंगाचे चित्रीकरण करण्यापूर्वी मी दोन तास या आरतीचा सराव केला. कारण दुष्ट शक्तींना दूर ठेवण्यासाठी यात विविध आरत्या म्हणाव्या लागत आहेत. त्यामुळे मी या सर्व आरत्या पाठ केल्या आणि त्यांचं लिप-सिंकिंगही शिकून घेतले. 
'नजर' या मालिकेत राठोड कुटुंबियांच्या अनेक पिढ्यांना मोहना नावाच्या एका डायनची नजर लागली असून त्याचा त्यांच्या जीवनावर कसा विपरित परिणाम होत असतो, ते यात दाखवण्यात आले आहे. 

Web Title: Harsh Rajput learned to lip sync for ‘Nazar’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nazarनजर