​सारेगमपा लिटल चॅम्पसमधील नवप्रीत कौरला हिमेश रेशमियाने दिली गाण्याची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 12:39 IST2017-02-02T07:09:31+5:302017-02-02T12:39:31+5:30

सारेगमपा लिटल चॅम्प्स या कार्यक्रमातील सगळ्याच चिमुकल्यांचा आवाज प्रेक्षकांना सध्या खूप आवडत आहे. देशभरातील 16 शहरांमधून सहभागी झालेल्या स्पर्धकांना ...

Hareesh Reshammiya offered the song for the song by Sarvegappa Little Champs Navpreet Kaur | ​सारेगमपा लिटल चॅम्पसमधील नवप्रीत कौरला हिमेश रेशमियाने दिली गाण्याची ऑफर

​सारेगमपा लिटल चॅम्पसमधील नवप्रीत कौरला हिमेश रेशमियाने दिली गाण्याची ऑफर

रेगमपा लिटल चॅम्प्स या कार्यक्रमातील सगळ्याच चिमुकल्यांचा आवाज प्रेक्षकांना सध्या खूप आवडत आहे. देशभरातील 16 शहरांमधून सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. यातील नवप्रीत कौर ही पंजाबची स्पर्धक गायक आरिफ लोहारची कट्टर चाहती आहे. ती लोकगीते तर खूपच छान गाते. 
नवप्रीतची घरची परिस्थिती ही अतिशय बेताची आहे. तिचे वडील वॉचमॅनचे काम करतात. पण तिला आपल्या वडिलांविषयी खूप आदर आहे. कोणतेही काम कमी दर्जाचे नसते असे तिचे म्हणणे आहे. नवप्रीत ही उत्तर भारतातील एका छोट्याशा गावात राहाणारी आहे. त्यांच्या गावात मुलींच्या शिक्षणाला महत्त्व न देता त्यांना घरकाम शिकवले जाते आणि खूपच कमी वयात त्यांचे लहान लावून दिले जाते. पण तिच्या वडिलांनी मुलीला या गोष्टींमध्ये न गुंतवता तिच्या कलेला अधिक महत्त्व दिले आहे. 
नवप्रीतने नुकतेच सारेगमपा लिटल चॅम्प्स या कार्यक्रमात कॉकटेल या चित्रपटातील जुगनी हे गाणे सादर केले होते. हे गाणे उपस्थितांना आणि प्रेक्षकांना खूपच आवडले. या गाण्याने तर संगीतकार-गीतकार हिमेश रेशमिया तर खूप भारावून गेला. त्याने स्वतःच्या हातातील घड्याळ तिला भेट म्हणून दिले. तसेच तिचे नामकरण त्याने मिट्टी की खुशबू असेच केले. 
हिमेश लवकरच एक लोकगीत संगीतबद्ध करणार असून हे गाणे गायची संधी मी नवप्रीतलाच देणार अशी त्याने कार्यक्रमात नुकतीच घोषणा केली. 
नवप्रीतचे वडील वॉचमॅनचे काम करण्याआधी तिच्याच शाळेच्या बाहेर समोसे विकत असत. त्यावेळी तिला आणि तिच्या बहिणीला शाळेतील मुले कशाप्रकारे चिडवत असत हा किस्सा तिने कार्यक्रमात सांगितल्यावर कार्यक्रमाची परीक्षक नेहा कक्करला तिचे अश्रू आवरले नाहीत. 
पाश्चिमात्य संगीताकडे आजच्या पिढीचा प्रचंड ओढा आहे. पण असे असतानाही नवप्रीतने लोकसंगीताला आपलेसे केले आहे याबद्दल सगळ्याच परीक्षकांना तिचे प्रचंड कौतुक आहे. 

Web Title: Hareesh Reshammiya offered the song for the song by Sarvegappa Little Champs Navpreet Kaur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.