आता वाजणार अन् गाजणार! 'जाऊ बाई गावात' नव्या रिअॅलिटी शोच्या गाण्याचा टीझर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 15:58 IST2023-11-24T15:57:01+5:302023-11-24T15:58:29+5:30
हार्दिक जोशीचा गावरान अंदाज या टिझरमध्ये पाहायला मिळतोय.

आता वाजणार अन् गाजणार! 'जाऊ बाई गावात' नव्या रिअॅलिटी शोच्या गाण्याचा टीझर आऊट
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेला राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी (hardeek joshi) लवकरच एका नव्या कार्यक्रमात झळकणार आहे. जाऊ बाई गावात या झी मराठीच्या कार्यक्रमात तो झळकणार असून नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमधून या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सहा स्पर्धकांची नाव जाहीर करण्यात आली आहेत. 'जाऊ बाई गावात' ह्या नव्या रिअॅलिटी शोचा आज आणखी एक उत्सुकता वाढवणारा धमाकेदार प्रोमोनंतर आता शीर्षक गीताचं टीझर झी मराठीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हार्दिक जोशीचा गावरान अंदाज ह्या टिझरमध्ये पाहायला मिळतोय. फक्त गाण्याच्या टीझरने इतकी क्रेझ निर्माण केली. त्यानंतर आता वाजणार अन् गाजणार हे गाणं भेटीला येणार आहे.
या शोमध्ये श्रेया म्हात्रे आणि मोनिशा आजगावकर या दोन स्पर्धक सहभागी होणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला त्याचे सहा स्पर्धक मिळाले आहेत. स्वत:च्याच प्रेमात असलेल्या या मुली गावाला त्यांच्या प्रेमात पडू शकणार का? ‘आता करणार तेव्हा कळणार'. हळू हळू तुमच्यासमोर उलगडतील आणखी एका पेक्षा एक व्यक्तिमत्वाचे स्पर्धक.
कोण आहेत हे सहा स्पर्धक
स्नेहा भोसले, संस्कृती साळुंखे, रसिका ढोबळे, हेतल पाखरे, म्हात्रे आणि मोनिशा आजगावकर
दरम्यान, प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा हा नवीन रिऍलिटी शो ‘जाऊ बाई गावात' येत्या ४ डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.