Hardeek Joshi Akshaya Deodhar Wedding: राणादा आणि पाठक बाईंचं लवकरच शुभमंगल सावधान!, केळवणाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 13:25 IST2022-08-15T13:25:11+5:302022-08-15T13:25:45+5:30
Hardeek Joshi Akshaya Deodhar Wedding : हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे कपल लवकरच लग्नबेडीत अडकणार असल्याचं समजतं आहे.

Hardeek Joshi Akshaya Deodhar Wedding: राणादा आणि पाठक बाईंचं लवकरच शुभमंगल सावधान!, केळवणाला सुरुवात
झी मराठी (Zee Marathi)वरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jeev Rangala)मधून राणादा आणि पाठकबाईंची जोडी हिट ठरली होती. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली होती. आता हे रिल लाइफमधील कपल रिअल लाइफमध्ये लग्न करणार आहेत. काही महिन्यांपूर्वी हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले होते. आता त्यांच्या लगीनघाईला सुरूवात झाल्याचे समजते आहे. त्यांचे पहिले वहिले केळवण पार पडले आहे आणि अक्षयाने फोटो शेअर करून याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. मात्र अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही. पण त्यांच्या लगीनघाईला सुरुवात झाल्याचे समोर आले आहे. हार्दिक आणि अक्षया यांचे पहिले केळवण नुकतेच पार पडले असून अक्षयाने याबद्दल फोटो शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे. या दोघांचं केळवण कोकणात पार पडले असून दोघेही यावेळी पारंपरिक वेशात दिसून आले. हार्दिक निळ्या रंगाच्या कुर्त्यात तर अक्षया निळ्या साडीत दिसून आली.
हार्दिक आणि अक्षया दोघांचीही नावं बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. हार्दिकचे नाव तर या चर्चांमध्ये अगदी सुरुवातीपासून आहे. तसेच हे कपल या वर्षात लग्न करणार आहेत, असे सुद्धा सांगितले जात आहे. त्यामुळे आता हार्दिक नेमका बिग बॉसमध्ये जाणार का हे लवकरच समजेल.