'हार के भी जितने वाले को बाजीगर कहते है...', डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितलं सुखी संसाराचं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 16:55 IST2023-07-26T16:54:21+5:302023-07-26T16:55:24+5:30

अवधूत गुप्ते(Avadhoot Gupte)चा लोकप्रिय शो 'खुपते तिथ गुप्ते'(Khupte Tithe Gupte) चा यंदाचा सीझन खूपच चर्चेत आहे. नुकतेच डॉ. अमोल कोल्हे यांनी या शोमध्ये हजेरी लावली होती.

'Har Ke Bhi Jitne Wale Ko Bajigar Kaheta Hai...', Dr. Amol Kolhe told the secret of a happy world | 'हार के भी जितने वाले को बाजीगर कहते है...', डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितलं सुखी संसाराचं गुपित

'हार के भी जितने वाले को बाजीगर कहते है...', डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितलं सुखी संसाराचं गुपित

अवधूत गुप्ते(Avadhoot Gupte)चा लोकप्रिय शो 'खुपते तिथ गुप्ते'(Khupte Tithe Gupte) चा यंदाचा सीझन खूपच चर्चेत आहे. आतापर्यंत या शोमध्ये राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्यासारख्या राजकारणी मंडळींनी हजेरी लावली होती. याशिवाय उर्मिला मातोंडकर, सई ताम्हणकरनेदेखील या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यानंतर आता या शोमध्ये डॉ. अमोल कोल्हे (Dr.Amol Kolhe) सहभागी झाले होते. त्यांच्या शोचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. एका प्रोमोत ते सुखी संसाराचं गुपित सांगताना दिसत आहेत.

खुपते तिथे गुप्ते शोमध्ये अवधुत गुप्तेने अमोल कोल्हेंना विचारलं की, कॉलेजमध्ये असताना वाद झाला आणि तुमची अनुरुप जोडी जुळली असं आम्ही ऐकलंय. तेव्हा वादात तुम्ही जिंकलात, तुमचं प्रेम जिंकलं. मात्र लग्नानंतर आता वहिनींसोबत वाद झाला तर कोण बरं जिंकते? प्रश्न ऐकल्यावर अमोल कोल्हेंना खळखळून हसले. कुठल्याही विवाहित पुरुषांच उत्तर एकच असते. कायम जिंकणारी ही बायको असते आणि नवऱ्यांनी कायम ह्यावर समाधान मानायचे असते हार के भी जितने वाले को बाजीगर कहते है... हे उत्तर ऐकून अवधूत वाह वाह म्हणत कौतुक केले. अमोल कोल्हेंच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसत आहे. 

खुपते तिथे गुप्ते या शोच्या नवीन भागाचे काही प्रोमो व्हिडीओ समोर आले आहेत. सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट याबाबतही अवधूत गुप्तेने अमोल कोल्हेंना प्रश्न विचारलेत. यावर अमोल कोल्हेंनी परखडपणे त्यांचं मत व्यक्त केले. अजित पवार की सुप्रिया सुळे? राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे असलं पाहिजे? असा प्रश्न अवधूत गुप्ते अमोल कोल्हे यांना विचारतो. अवधूतच्या या प्रश्नाचे उत्तर देत अमोल कोल्हे क्षणाचाही विलंब न करता शरद पवार असे म्हणाले.

Web Title: 'Har Ke Bhi Jitne Wale Ko Bajigar Kaheta Hai...', Dr. Amol Kolhe told the secret of a happy world