करिष्मा कपूरसाठी सुखद आठवणींचा सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 18:16 IST2018-11-01T18:13:30+5:302018-11-01T18:16:03+5:30

९० च्या संकल्पनेनुसार इंडियाज्‌ डान्सिंग क्वीन करिष्मा कपूरने डान्स प्लस ४ च्या मंचावर हजेरी लावली होती.

Happy memories ceremony for Karishma Kapoor | करिष्मा कपूरसाठी सुखद आठवणींचा सोहळा

करिष्मा कपूरसाठी सुखद आठवणींचा सोहळा

ठळक मुद्देकरिष्मा व रेमोने केला दमदार डान्स

९० च्या संकल्पनेनुसार इंडियाज्‌ डान्सिंग क्वीन करिष्मा कपूर 'डान्स प्लस ४' च्या मंचावर सेलेब्रिटी अतिथीच्या रूपात उपस्थित होती. तिच्या चार्टबस्टर गाण्यांवरील ह्या शोमधील कलाकौशल्य पाहून ही डान्सिंग दिवा करिष्मा अगदी थक्क झाली. गॅंग १३ ह्या ग्रुपने आपल्या खास शैलीत करिष्माच्या जुडवा चित्रपटातील आयकॉनिक टन टना टन गाण्यावर परफॉर्म केले आणि ते तिला तुफान आवडले. त्यानंतर तिने या गाण्याच्या संदर्भातील आठवणीला उजाळा दिला. 

 टन टना टन हे गाणे फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये त्याच मजल्यावर २२ वर्षांपूर्वी चित्रीत करण्यात आले होते. आठवणींच्या सुखद क्षणांमध्ये हरवलेल्या करिष्माने मग त्याच स्टेप्स त्याच मंचावर येऊन पुन्हा एकदा अगदी जिवंत केल्या. डान्स ४ च्या मंचावर त्याच मजल्यावर त्याच गाण्यावर एवढ्‌या वर्षांनंतर डान्स करताना ती जुन्या आठवणींमध्ये हरवून गेली. ती म्हणाली, “माझे सुपरहिट गाणे टन टना टन हे ह्याच स्टुडिओमध्ये ह्याच मजल्यावर चित्रीत करण्यात आले होते, आणि ह्या परफॉर्मन्समुळे मी आठवणींमध्ये हरवून गेले.”
तसेच करिष्माने रेमोने कोरियोग्राफ केलेल्या गाण्यावर थिरकायचे असल्याचेही म्हटले. याबाबत ती म्हणाली की, एक दिवस रेमो मला कोरियोग्राफ करेल. 
 डान्स प्लस ४च्या मंचावर स्पर्धकांनी करिष्माची गाजलेली गाणी ऊंची है बिल्डिंग, टन टना टन, सोना कितना सोना है, चक धूम चक धूम, इश्‍क है सुहाना, तुम तो धोखेबाज हो या गाण्यावर दमदार परफॉर्मन्स केला. इतकेच नाही तर या मंचावर करिष्मा रेमो डिसुझासोबत लोकप्रिय गाणे हसीना मान जायेगीवर 
डान्स केला.

Web Title: Happy memories ceremony for Karishma Kapoor